शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर पुन्हा चालला गजराज

By admin | Updated: January 21, 2016 02:00 IST

नगर परिषद प्रशासनाच्यावतीने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण ते पुन्हा जैसे थे होते. यामुळे आता अतिक्रमण हटविण्याकरिता पालिकेने पथकच तयार केले.

नगर परिषदेची धडक कारवाई : तीन दिवस चालणार मोहीम, फिरत्या पथकाचा वॉचवर्धा : नगर परिषद प्रशासनाच्यावतीने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण ते पुन्हा जैसे थे होते. यामुळे आता अतिक्रमण हटविण्याकरिता पालिकेने पथकच तयार केले. तीन दिवस ही अतिक्रमण हटाव मोहीम धकडपणे राबविली जाणार आहे. बुधवारी बजाज चौक ते रेल्वेस्थानक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले.न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत नगर अभियंता सुधीर फरसोले, आरोग्य निरीक्षक रवींद्र टप्पे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. बजाज चौक येथील भाजी बाजार परिसरात रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. फळ व अन्य विक्रेत्यांनी रस्त्यापर्यंत लावलेले शेड काढण्यात येऊन जेसीबीच्या साह्याने सदर परिसर खोदून काढला. बजाज चौकातील सुमारे दहा विक्रेत्यांची अतिक्रमणे काढण्यात आली. यापूढे अतिक्रमण केल्यास दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.बजाज चौक ते रेल्वेस्थानक या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ व भाजीविक्रेते रस्त्यापर्यंत हातगाड्या लावून व्यवसाय करतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. हे अतिक्रमण कित्येक वेळा हटविण्यात आले; पण सदर विक्रेते पुन्हा तेथेच बंड्या लावत असल्याने परिस्थिती जैसे थे होते. १९ ते २१ जानेवारीपर्यंत असेलली ही अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पोलीस ताफा उपलब्ध नसल्याने बुधवारपासून सुरू झाली. यात नगर परिषदेचे व पोलीस कर्मचारी अशा २५ जणांच्या ताफ्याने हा परिसर मोकळा केला. न.प. मुख्याधिकारी वाघमळे यांनी पालिकेत चार कर्मचाऱ्यांचे एक पथक अतिक्रमणावर देखरेख ठेवण्याकरिता नियुक्त केले. या पथकाद्वारे शहरातील काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही, याकडे लक्ष ठेवले जाणार आहे. शिवाय प्रत्येक सात दिवसांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी न.प. चे पाच व पोलीस विभागाचे दोन कर्मचारी असे सात लोकांचे फिरते पथक तयार केले. ९ फेबु्रवारीपासून बांधकाम विभाग, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये बुधवारी लिलाधर निखाडे, लोहवे, चहांदे, सोमवंशी यांच्यासह न.प. कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ही मोहीम पूढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)मोठ्या व्यावसायिकांच्याही हातगाड्याशहरात ठिकठिकाणी हातगाड्यांवर फळ, भाजी व अन्य वस्तूंची विक्री करणारे गरीब व्यावसायिक असावेत, असा बहुतांश नागरिकांचा समज असतो; पण तसे नाही. प्रत्यक्षात एक वा दोन मोठ्या व्यावसायिकांच्या या हातगाड्या असल्याचे नगर अभियंता फरसोले यांनी सांगितले. बजाज चौकात फळ, भाजीविक्री करणारे भाडेतत्वावर माल व बंडी घेतात. दिवसभर विक्री करून सायंकाळी संबंधित मालकास हिशेब देतात व मजुरी घेत असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडून फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जात असताना ही बाब उघड झाली. यामुळे हा प्रकार आता बंद होणार आहे. शहरातील या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्याने गरीबांच्या व्यवसायावर गदा येते, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते विक्रेते खरे विक्रेतेच नसल्याचेही फरसोले यांनी सांगितले.