शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

५० झोपड्यांवर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:25 IST

नजीकच्या बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. त्या सुमारे ५० झोपड्या बुधवारी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहे.

ठळक मुद्देबोरगाव (मेघे) ग्रा.पं.ची अतिक्रमण हटाव मोहीम : त्या जागेवर जलकुंभ तयार होणार

ऑनलाईन लोकमतवर्धा : नजीकच्या बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. त्या सुमारे ५० झोपड्या बुधवारी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहे. या ठिकाणी जलकुंभ तयार होणार आहे. सदर अतिक्रमण नागरिकांनी स्वत:च काढून टाकावे अशा सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ग्रा.पं. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ येथील चितोडा मार्गावरील ग्रामपंचायतीच्या अधिनस्त असलेली महसूल विभागाची झुडपी जंगली जागा आहे. तेथे काही महिन्यांपूर्वी परिसरातील काही नागरिकांनी थेट अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. नागरिकांचा हा प्रकार गाव विकासाच्या कामाला अडचण निर्माण करणारा असल्याने सुरूवातीला बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाने झोपड्या बांधणाºया नागरिकांना सदर अतिक्रमण त्यांनी स्वत:च काढण्यासंबंधीचा नोटीस बजावला होता. त्याकडे अतिक्रमण धारकांनी पाठ दाखविल्याने त्यानंतर परिसरात दवंडी देण्यात आली;पण त्याकडेही दुर्लक्ष करीत अतिक्रमण कायम राहिल्याने बुधवारी ग्रामपंचायत प्रशासनाने थेट अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.सदर जागेवर सुमारे ५० कुटुंबियांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रा.पं.च्या पथकाने बुधवारी सुरूवातीला अतिक्रमण धारकांनी अर्ध्यातासात स्वत:च अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या. त्या अनुषंगाने काही अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढले. मात्र, काही अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण कायम ठेवल्याने शेवटी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढून परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.ही कारवाई बोरगाव (मेघे)च्या सरपंच योगीता देवढे, ग्रामविकास अधिकारी डी. दिवटे, उपसरपंच मोहन येरणे, तलाठी सुनील ठाकरे, मनोज चौधरी, सुरजीत चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, चोपडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत तणावपूर्ण शांततेत करण्यात आली. सदर जागेवर जलकुंभ बांधण्यात येणार असल्याने सरपंच देवढे यांनी सांगितले.परिसराला पोलीस छावणीचे स्वरूपअतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. ज्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली तेथे मार्शल पथक एक, दोन व तीनसह शहर ठाण्यातील पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला काही काळासाठी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. ग्रा.पं.ने तणावपूर्ण शांततेत मोहीम राबविली.झाले होते आरोप-प्रत्यारोपबोरगाव (मेघे) वॉर्ड ५ भागातील ज्या ठिकाणचे अतिक्रमण बुधवारी काढण्यात आले. त्याच अतिक्रमण धारकांकडून बोरगाव (मेघे) मधील एका ग्रा. पं. सदस्याने जागा देतो म्हणून पैसे घेत अतिक्रमण धारकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण शहर पोलिसांपर्यंतही पोहोचले होते. शेवटी आज वॉर्ड ५ मधील अतिक्रमण काढण्यात आल्याने सदर आरोपांना अर्धविराम मिळाला असल्याची परिसरात चर्चा होती.