शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:47 IST

शहरातील टिळक चौक ते तुकडोजी पुतळा या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले.

ठळक मुद्देहिंगणघाट शहरातील रस्ते मोकळे : आणखी ३-४ दिवस राबविणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील टिळक चौक ते तुकडोजी पुतळा या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले. पुढच्या ३ ते ४ दिवसांत ही मोहीम शहरभर राबविण्यात येणार आहे.शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होत आहे. ही अतिक्रमणाची मोहीम नगर पालिका हिंगणाघाट यांच्यावतीने कार्यान्वित करण्यात आली. आज दिवसभर चालणारी मोहीम अन्य भागातील अतिक्रमण व हिंगणघाट नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीकृष्णकांत पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पालिकेचे अधिकारी माळवे, तळवेकर, अली, सुनील घोडमारे, प्रकाश कोल्हे, आदींचे सहकार्य होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून वर्धेहून अतिरिक्त पोलीस बळ यासाठी मागविण्यात आला होता. संबंधित अन्य शासकीय अधिकाºयांची उपस्थित होती. नायब तहसीलदार तायडे, पोलीस सब इन्स्पेक्टर कोल्हे यांची उपस्थिती होती.शहरातील एस.एस.एम. कन्या शाळा रस्त्यावर तसेच अन्य भागातील मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. अतिक्रमणात अनेक पानठेले, चहा टपरी, तसेच लहान छोट्या दुकानदारांना हुसकविण्यात आले असून अनेक व्यावसायिकांचे बाहेरचे टिनाचे शेड यांच्यावर जेसीबीने झडप दिली. अनेकांचे शेड पाडण्यात तर समोर आलेले अतिक्रमण हटविण्यात आले. मोहीम आणखी तीन-चार दिवस चालविण्यात येणार असून शहरातील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मोहीमेत जेसीबी, ट्रॅक्टर, आणि अन्य वाहन मदतीला होती.वर्षानुवर्षांचे अतिक्रमण भुईसपाटशहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मागील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना हा रस्ता आहे की बोळ, असा भास होत होता. अतिक्रमण काढताच रस्त्याची रूंदी वाढली आणि वाहतुकीचीही समस्या मार्गी लागल्याच्या प्रतिक्रीया या भागातील नागरिक देत आहेत. पालिकेच्यावतीने ही मोहीम अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.