शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:57 IST

शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देअनेकांना जागा मोकळी करण्याच्या सूचना : कारंजा येथे नगरपंचायतच्या ठरावानंतर हटविले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. यामुळे अखेर पालिकेच्यावतीने शनिवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.पालिकेच्यावतीने आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही मोहीम रबविणे सुरू केले. प्रारंभी शिवाजी चौकात कारागृहाच्या भिंतीलगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. यानंतर ही मोहीम शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौक परिसराकडे वळली. यात ठाकरे मार्केट परिसरातील पानटपऱ्यांची छते काढण्यात आली. तर त्यांना टपऱ्या तत्काळ उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केले.अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या अतिक्रमणाला प्रारंभी काही व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. या विरोधाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बगल देण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम आणखी काही दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, नगर अभियंता सुधीर फरसोले, निखिल लोहवे, निलेश नंदनवार, अनुप अग्रवाल, विपीन गोटेकर, अशोक ठाकूर, चेतन खंदारे यांच्या पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.छोट्यांवरच कारवाई, मोठ्यांना बगलनगर परिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांवरच कार्यवाही केली जाते. रस्त्याच्या कडेला दुकान लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवरच गजराज चालविला जातो. शहरात अनेक मोठ्या व्यापाऱ्यांकडून पक्के अतिक्रमण केले आहे. याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ते अतिक्रमण काढताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वेळ टाळली जाते, असा आरोप छोट्या व्यवसायिकांकडून यावेळी करण्यात आला. पालिकेच्यावतीने मोठ्या व्यापाºयांच्या अतिक्रमणावरही गजराज चालवावा अशी मागणी आहे.नागरिकांची गर्दीवर्दळीचा चौक असलेल्या शिवाजी चौक परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या अनेकांकडून ती पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असला तरी या चौकात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.स्वच्छ शहराकरिता मोहीमपालिकेच्यावतीने स्वच्छ शहर अभियान राबविले जात आहे. अभियानात अनेक ठिकाणी सौदर्यीकरण करण्यात येत आहे. या सौदर्यीकरणात ही दुकाने अडसर ठरत असल्याने ती काढण्यात येत असल्याची माहिती मोहिमेत सहभागी असलेल्या पालिकेच्या कर्मचाºयांकडून देण्यात आली. रोजगारावर गजराज चालवून कोणते सौदर्यीकरण करण्यात येईल, असा प्रश्न विचारल्या जात आहे.