शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ केल्यामुळे मित्रानेच केली गजाननची हत्या

By admin | Updated: March 15, 2015 01:53 IST

होळीच्या दिवशी जाम जवळील पंचगव्हात परिसरात गजानन बन्सोडची हत्या झाली होती.

समुद्रपूर : होळीच्या दिवशी जाम जवळील पंचगव्हात परिसरात गजानन बन्सोडची हत्या झाली होती. त्याची हत्या त्याच्या मित्रानेच केली असल्याचा खुलासा शुक्रवारी रात्री झाला. या प्रकरणी कुणाल शिवणकर रा. उपरवाही, जि. नागपूर याला अटक करण्यात आली. समुद्रपूर येथील गजानन गुलाब बन्सोड (३६) याचा मृतदेह पि.व्ही. टेक्सटाईल्सच्या मागे पंचगव्हाण शिवारात आढळून आला. त्याच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू असताना मृतकाचा मित्र कुणाल रमेश शिवणकर (२३) याची चौकशी केली असता त्याच्या बयानात तफावत असल्याचे दिसून आली. यावरून त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. कुणाल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ५ मार्चच्या रात्री गजानन हा नशेत आला असता कुणालशी त्याचा वाद झाला. यात गजानन याने कुणालला पिण्याकरिता पाणी मागितले. तेव्हा तुला पाणी पाहिले असल्यास कॅनलच्या बाजूने येण्यास सांगितले. यावेळी गजानन याने पुन्हा शिवीगाळ केली. यामुळे कुणालने त्याच्या हातातील दांडा त्याला फेकुन मारला. तो त्याच्या डोक्याला लागला. यावरून दोघोत पुन्हा वाद झाला. जवळ जावून पाहिले असता गजाननच्या डोक्यातून रक्त येताना दिसले. कुणालला वाटले हा आता आपली तक्रार करेल व पोलीस पकडतील, या कारणाने त्याने त्याच काठीने गजाननचा डोक्यावर वार केले. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ही कारवाई ठाणेदार जिट्टावार, पोलीस उपनिरीक्षक अशोक माहुरकर, जमादार उमेश हरणखेडे, विरेंद्र कांबळे, बजरंग कुंवर, प्रकाश मैद, चंद्रकांत बुरीले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)