शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी घेणार गगन भरारी

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

‘घेईन मी उंच भरारी आकाशात’ या अनोख्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील दारिद्र्यरेषेखालील प्रावीण्यप्राप्त २५ विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीचा प्रवास घडवणार आहे.

मिलिंद भेंडे यांची माहिती : २५ गुणवत्ताप्राप्त गरीब विद्यार्थ्यांना घडणार विमान प्रवासवर्धा : ‘घेईन मी उंच भरारी आकाशात’ या अनोख्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील दारिद्र्यरेषेखालील प्रावीण्यप्राप्त २५ विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीचा प्रवास घडवणार आहे. संसदेला हे विद्यार्थी भेट देऊन परत विमानाचा प्रवास करतील, अशी माहिती जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियाही गमतीशीर आहे. आठही पंचायत समितीस्तरावरील प्रत्येक शाळेतून दारिद्र्य रेषेखालील व गुणवत्ताप्राप्त पाच विद्यार्थ्यांची निवडले जाईल. प्रत्येक शाळेने निवडलेल्या पाच विद्यार्थ्यांची सोडत काढली जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक पंचायती समितीस्तरावर तीन याप्रमाणे २५ विद्यार्थ्यांची निवडले जाणार. यातून विद्यार्थ्यांना हा विमान प्रवास घडणार आहे. खा. रामदास तडस हे स्वत: या विद्यार्थ्यांना दिल्लीला संसद भवन दाखविणार आहेत. विद्यार्थ्यांचा हा विमान प्रवास हिवाळी अधिवेशनादरम्यान घडविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचेही मिलिंद भेंडे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी रक्तदानाचा नवा विक्रम करणारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जन्मशताब्दी वर्ष आहे. या अनुषंगाने ६ डिसेंबरला डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व आरोग्य विभाग करीत आहे. पंचायत समितीस्तरावरील या शिबिरात जिल्ह्यातील ४७० जणांच्या रक्तदानाचा जुना विक्रम मोडीत १ हजार रक्तदाते रक्तदान करण्याचा नवा विक्रम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. शिबिरात शिक्षक व पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधीही सहभाग नोंदवून रक्तदान करतील. शिक्षकांकडून संकल्पपत्रही भरुन घेतले जात आहे. वर्धेला पंचायत समिती, तर सेलू, समुद्रपूर, देवळी, आष्टी व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय आणि हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात या शिबिराचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे, अशी माहितीही सभापती मिलिंद भेंडे यांनी दिली. जि.प.चा आरोग्य विभाग उघडणार ‘रक्तदाता’ संकेतस्थळरक्ताची वाढती मागणी आणि वेळेवर रुग्णाला रक्तपुरवठा व्हावा, या उद्दात्त हेतूने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘रक्तदाता’ नावाने संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी, अधिकाऱ्यांची नावे, त्यांचा रक्तगट आणि संपर्क क्रमांक असणार आहे. यामध्येही रक्तदात्यांची नावे तालुकानिहाय असणार आहे. तसेच शिक्षक, कर्मचारी, अधिकारी याप्रमाणे श्रेणीनुसार नावे असणार आहे. या संकेतस्थळावर इतरांनाही आपले नाव, रक्तगट व संपर्क क्रमांक नोंदविता येण्याची सोय असणार आहे, अशी माहितीही सभापती भेंडे यांनी यावेळी दिली.