शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्याने शेतकºयांत रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:14 IST

वडगाव (कला), वडगाव (खुर्द) व परिसरातील शेतकरी अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या परिसरातील वीजतारा सदोष असून सैल पडल्या आहेत. रोहित्राचे तीनतेरा झाले आहे.

ठळक मुद्देवडगाव शिवारातील प्रकार : तारा सैल पडल्या, रोहित्राचीही दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : वडगाव (कला), वडगाव (खुर्द) व परिसरातील शेतकरी अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या परिसरातील वीजतारा सदोष असून सैल पडल्या आहेत. रोहित्राचे तीनतेरा झाले आहे. वीज कर्मचाºयांचे दर्शनच होत नाही. शेतकरी वैतागून नियम हाती घेत लहान-मोठ्या दुरूस्त्या धोका पत्करून करतात. सध्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कामे सोडून रोहित्राजवळ ठिय्या मांडून बसतात, अशी अवस्था झाली आहे.या परिसरात बागायती शेती अधिक आहे. केळीच्या बागाही आहेत; पण वीज वितरण कंपनीचा शेतकºयांना शाप आहे. आडात आहे; पण पोहºयात नाही, अशी केविलपाणी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसातून १०० वेळा अर्थात दहा-पाच मिनीट पंप चालला की वीज खंडित होते. याकडे कंपनीचे दुर्लक्ष आहे. रोहित्राजवळ फ्युजच्या पेटीतील फ्युज अनेक वर्षांपासून लावलेच गेले नाही. तेथे थेट फ्युज तार टाकला जातो. लाईनमन नसल्याने शेतकरीच हा धोका नाईलाजाने जीवावर उदार होऊन पत्करतात; पण निद्रिस्त यंत्रणेला जाग येत नाही.ओलितासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात हजर राहत असले तरी वारंवार वीज खंडित होत असल्याने सिंचनच धोक्या आले आहे. वीज खंडित होताच शिवारातील सर्व शेतकरी रोहित्राजवळ गोळा होऊन ठिय्या मांडतात; पण लक्ष देण्यास कुणी तयार नाही. वैतागलेल्या शेतकºयांनी रेहकीच्या वीज कार्यालयात जाऊन निवेदन दिले; पण त्याला केराची टोपली देण्यात आल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या. निवेदन दिल्यानंतर अद्याप सुधारणा करण्यात आलेली नाही. शेतकºयांचा रोष वाढत आहे.यामुळे कायमस्वरूपी वीज कर्मचारी, रोहित्र व तारांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी वडगाव येथील मनोहर हिवरकर, जीवन महाकाळकर, दिनेश बोबडे, नितीन भुरे, कवडू बोबडे, अभिजीत तितरे, नितीन अग्निहोत्री, वैभव शेंडे, प्रशांत शेंडे, जयकुमार शुक्ला, देविदास पारसे, कवडू बेंडे, किशोर वाघमारे, रमेश बावणे, नरेश मालगण, संतोष कुळसंगे, घनश्याम टेकाम, ज्ञानेश्वर राऊळकर, गोपाल बावणे, मनोज तिमांडे, सचिन, विवेक, गणेश शेंडे, जगदीश डोळसकर, पुरूषोत्तम अवघडे, राहुल बोबडे, नंदकिशोर ढोबळे आदी शेतकºयांनी केली आहे.