शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:35 IST

शहरातील विविध विकास कामांचा श्रीगणेशा खा. रामदास तडस व आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व आ. डॉ. भोयर यांनी सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्देखासदारांसह आमदारांची ग्वाही : विविध विकास कामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरातील विविध विकास कामांचा श्रीगणेशा खा. रामदास तडस व आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व आ. डॉ. भोयर यांनी सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.भाजप सेलूच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. पंकज भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. च्या महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, पं. स. सभापती जयश्री खोडे, नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल, उपाध्यक्ष चुडामन हांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, नगरपंचायतचे विरोधी पक्ष नेता शैलेंद्र दप्तरी, जि.प. सदस्य विनोद लाखे, वरूण दप्तरी, जलतज्ञ मनोहर सोमनाथे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जि. प. सदस्य विनोद लाखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शैलेंद्र दप्तरी यांनी केले. संचालन अशोक कलोडे यांनी केले तर आभार संजय अवचट यांनी मानले. या विशेष कार्यक्रमात माहेर मंगल कार्यालय ते बस स्थानक, संताजी सभागृह ते बस स्थानक या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. शिवाय ५२५ लाख रुपयांचा निधी खर्चून विविध विकास कामे करण्यात यईल असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वरूण दप्तरी, शब्बीर अली सय्यद, चंद्रशेखर वंजारी, निसार सैय्यद, मनीष खंडाळकर, हेमंत नाईकवाडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकत्यांनी सहकार्य केले.