शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वैरण उत्पादनाकरिता ४७ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

योजनेअंतर्गत गतवर्षी प्राप्त २० लाखांच्या निधीतून १ हजार ३३३ लाभार्थ्यांना वैरण बियाणे व ठोंबे वितरण करण्यात आले. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे चाराटंचाईची परिस्थिती होती. त्या अनुषंगाने तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे यांच्या उपस्थितीत आठही तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली.

ठळक मुद्देचाराटंचाईवर मात : पालकमंत्री, जि. प. अध्यक्षांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता भरून काढणे, पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाची उत्पादकता वाढविणे आणि पशुधनाला पुरेसे हिरवे वैरण उपलब्ध करणे अर्थात शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उपलब्ध होण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्री सुनील केदार यांनी ४७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रतिएकर १५०० रुपयांच्या मर्यादेमध्ये वैरणीच्या विविध प्रजातींच्या बी-बियाण्यांचा आणि ठोंब्यांचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा पशुपालकांना केला जाणार आहे.योजनेअंतर्गत गतवर्षी प्राप्त २० लाखांच्या निधीतून १ हजार ३३३ लाभार्थ्यांना वैरण बियाणे व ठोंबे वितरण करण्यात आले. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे चाराटंचाईची परिस्थिती होती. त्या अनुषंगाने तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे यांच्या उपस्थितीत आठही तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली.त्यानुसार २०१९-२० च्या उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई निर्माण न होण्याकरिता वैरण पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुपालकांकडून बियाणे, ठोंबे यांची वास्तविक मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार साधारणत: ३ हजार ४५१ पशुपालकांनी विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे नोंदविलेल्या मागणीनुसार ५३ लाखांची गरज होती. २०१९-२० मध्ये या योजनेकरिता २० लाखांचा निधी मंजूर होता.आवश्यक अतिरिक्त ३३ लाखांच्या निधीची मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती माधव चंदनखेडे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष नितीन मडावी, कृषी व पशुसंवर्धन समितीचे तत्कालीन सभापती मुकेश भिसे यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. त्यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत अतिरिक्त ३३ लाखांचा निधी मंजूर करून दिला.पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत वितरणमका ४५ हजार ६३६ किलोग्रॅम, ज्वारी २४ हजार ८१६ किलोग्रॅम, न्युटीफीड १ हजार २३४ किलोग्रॅम, ठोंबे ३ लाख ७५ हजार ५०० नग खरेदी करून वैरण बियाण्यांचे वाटप पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. राजेश भोजने, डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी केले आहे.अशी आहे तरतूदवैरण बियाणे खरेदीकरिता एकूण ४३ लाख ७८ हजार ३१६ आणि ठोंबे खरेदीकरिता ३ लाख ७५ हजार ५०० अशी एकूण ४७ लाख ५३ हजार ८१६ तरतूद खर्ची घातली जाणार आहे.योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करीत वैरण बियाणे आणि ठोंबे उपलब्ध करून घ्यावेत. यातून चाराटंचाईवर मात करता येणार आहे.-माधव चंदनखेडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, जि. प. वर्धा.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्री