शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

नियमित मानधनसाठी संगणक परिचालकांचा मोर्चा

By admin | Updated: November 10, 2014 22:48 IST

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत इपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यात राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रा़पं़ मध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एन्ट्री

वर्धा : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत इपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यात राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रा़पं़ मध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली; पण त्यांचे मानधन महाआॅनलाईनमार्फत नियमित दिले जात नाही़ यामुळे मानधन नियमित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांना निवेदनातून करण्यात आली. तत्पूर्वी संगणक परिचालक संघटनेच्यावतीने बजाज चौक ते जि.प. कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला़महाआॅनलाईन ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार कंपनीद्वारे जि.प. स्तरावर एक संगणक प्रोग्रामर, ४ संगणक परिचालक, पंचायत समिती स्तरावर एक संगणक प्रोगामर आणि २ आॅपरेटर आणि एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रा.पं. मध्ये प्रत्येकी एक डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार वरील सर्व पदांना ठरवून दिल्याप्रमाणे मानधन देण्यात येते; पण ग्रा.पं. स्तरावरील संगणक परिचालकांना ठरलेले मानधन दिले जात नाही़ ग्रा़पं़ स्तरावर आॅपरेटरला ८ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आहे; पण ३५०० ते ४१०० प्रमाणे प्रत्येक आॅपरेटरला मानधन अदा केले जात आहे़ यामुळे सदर कंपनी ग्रा.पं. आॅपरेटरचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यातच आता नव्याने कोणतेही शासन परिपत्रक नसताना महाआॅनलाईनने प्रत्येक महिन्यात ४५० डाटा एन्ट्री करणे सक्तीचे केले आहे़ ते न केल्यास काहीही मानधन मिळणार नाही, असे जाहीर करीत तालुका व जिल्हा समन्वयकांमार्फत सक्तीचे केले आहे. अनेकांना चार ते पाच महिन्यापसून मानधन देण्यात आलेले नाही़ दर दिवसाची हजेरी युनिटी आय.टी. या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते; पण मानधन अदा केले जात नाही. शासनाने एकाच परिपत्रकाद्वारे सर्वांना मानधन ठरवून दिले असताना आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे़ यामुळे वर्धा तालुक्यातील प्रत्येक ग्रा.पं. मधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्यावतीने कंपनीमार्फत आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी महाआॅनलाईन विरोधात मोर्चा काढण्यात आला़ घोषणाबाजी करीत वर्धा तालुका डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनमार्फत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांना निवेदन देण्यात आले़यावेळी खासदार रामदास तडस यांनीही आंदोलकांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या़ लवकरच ही समस्या मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही दिली़ शिष्टमंडळात बिट्टू रावेकर, तुषार राऊत, निलेश वैरागडे, निखिला कहाथे, विपूल शिंदे, विवेक दुधकोहळे, काळे, धमाणे, बावणे, शेंडे, टेकाम आदींचा सहभाग होता. खासदार रामदार तडस हे स्वत: शिष्टमंडळासोबत निवेदन देताना उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)