शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याकरिता नगराध्यक्षाच्या घरावर मोर्चा; शहरात तणाव

By admin | Updated: May 29, 2017 01:07 IST

मुबलक पाणी असताना या गावात नगरपरिषदेच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्याकरिता नागरिकांची भटकंती होत आहे.

नियोजन शून्यतेचा फटका : मुबलक पाणी तरीही पाणीटंचाई लोकमत न्यूज नेटवर्क सिंदी (रेल्वे) : मुबलक पाणी असताना या गावात नगरपरिषदेच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्याकरिता नागरिकांची भटकंती होत आहे. भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यामुळे संतापलेल्या महिलांसह नगरसेविका सुमन पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक १ मधील १०० ते १५० नागरिकांनी शनिवारी रात्री नगराध्यक्ष संगिता शेंडे यांच्या घरासमोर ठिय्या केला. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सविस्तर वृत्त असे की, सिंदी येथील पाणी पुरवठा ११ किमी अंतरावरील वाकसूर नदीवरुन केला जात आहे. वाकसूर डोहात मुबलक पाणी उपलब्ध आहे. शिवाय गावात ६ लक्ष लिटरची क्षमता असलेली पाण्याची टाकी आहे. येथून शहरातील २,४०० नागरिकांना पाणी सोडले जात आहे. असे असताना स्टेशन व नदी पलीकडील नागरिकांना नगरपरिषद पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्याकरिता भटकावे लागत आहे. या बाबतीत अनेकदा लेखी तक्रार करूनही यावर मार्ग काढला नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी रात्री १० वाजता नगराध्यक्ष संगिता शेंडे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. यावेळी नगराध्यक्ष बाहेरगावी गेल्याचे समजले. रात्री ११ वाजता नगराध्यक्ष व त्याचे पती सुनील शेंडे तसेच उपाध्यक्ष वंदना डकरे व त्याचे पती दिलीप डकरे नगराध्यक्षांच्या घरी आले. यावेळी उपस्थित मोर्चातील महिला नगराध्यक्षांशी आमच्या भागात नियमित पाणी देण्यात यावे अशी चर्चा करीत असताना उडालेल्या शाब्दिक चकमकीत सुनील शेंडे व दिलीप डकरे यांनी मोर्चातील महिला व पुरुषांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताळण्याकरिता पोलिसाना पाचारण करावे लागले. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने सिंदी शहराचा विकास होईल व उन्हाळ्यात भेडसवणारी पाण्याची समस्या कायमस्वरुपी निकालात निघेल याकरिता सिंदी शहरवासीयांनी नगर परिषदेत भाजपाची सत्ता दिली; पण स्थानिक भाजपात आपसी ऐक्य नसल्याने शहराला त्याचा फटका बसत विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप आहे.