शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात

By admin | Updated: August 26, 2014 00:09 IST

केवळ ५०० रुपयांकरिता मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील काजळी येथे घडली. लोखंडी हातोडीने डोक्यावर व मांडीवर वार

कारंजा (घाडगे) : केवळ ५०० रुपयांकरिता मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील काजळी येथे घडली. लोखंडी हातोडीने डोक्यावर व मांडीवर वार करून ही हत्या करण्यात आली. यात स्वत:च्या बचावाकरिता मारेकऱ्याने रचलेल्या नाट्याचे बिंग पोलिसी हिसका दाखविताच फुटले. मृतकाचे नाव मनोज वाकडे असे असून मारेकऱ्याचे नाव रामभाऊ चरपे असे आहे. मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काजळी येथे सुर्यभान सांभारे रा. दत्तवाडी नागपूर यांचे शेत आहे. येथे त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या व्यवस्थापनाकरिता मॅनेजर म्हणून मनोज वाकडे (३९) रा.जाट तरोडी, नागपूर हा गत दहा महिन्यांपासून कार्यरत होता. गत दहा दिवसांपासून याच ठिकाणी जुनी ओळख व मैत्री असल्याने सांभारे याने प्रभाकर रामभाऊ चरपे (३५) रा.मोहाड, ता.नरखेड, जि.नागपूर याला कामावर ठेवले. पोळा असल्याने रविवारी कामागारांचा पगार झाला; परंतु दहा दिवसांपूर्वीच कामावर आलेला प्रभाकर चरपे याचा पगार झाला नाही. येथील इतर कामगार रात्री घरी निघून गेले. नित्याप्रमाणे मनोज वाकडे हा शेतातच मुक्कामी होता. दरम्यान रात्री मनोज वाकडे व प्रभाकर चरपे यांनी सोबतच जेवण घेतले. प्रभाकर याने जेवणानंतर मनोज वाकडे याला ५०० रुपये उधार मागितले. यावरुन दोघांमध्ये झालेल्या वादात प्रभाकरने एका हातोडीने मनोज याच्या डोक्यावर व मांडीवर घाव घातले. यात रक्ताच्या थारोळ्यात पडून मनोजचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रभाकर वर भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर कार्यवाही ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)