शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळामुळे शेतशिवार होतेय सुपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:51 IST

येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत.

ठळक मुद्देशेणखतावरील खर्चाची बचत : ‘गाळयुक्त’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संघर्ष जाधव।लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत. तलावातील गाळ शेतात टाकल्या जात असल्याने शेणखतावर होणाऱ्या चर्चाची बचत होत आहे.तलाव आणि धरण आदी जलाशयांमधील गाळ शेतजमिनीची पोत वाढविण्यासाठी फायद्याचा ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तलाव गाळमुक्त होत त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ व्हावी तसेच तलावातील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकून शेतजमिनीची पोत सुधारावी या उद्देशाने शासनाच्यावतीने गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याच योजनेच्या माध्यमातून यंदा येथील मत्स्यबिज केंद्राचा तलाव गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या तलाव गाळमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर गाळ या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वाहून नेत आहेत. या तलावातून काढण्यात येणार गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी न्यावा असे आवाहन तहसीलदारांसह इतर बड्या अधिकाऱ्यांनी सुरूवातीला केले होते. त्याच्या आवाहनाला केळझर व परिसरातील शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या मिळत आहे.पैशाची होतेय बचतसध्या शेणखताचे भाव प्रति ट्रॅक्टर दोन ते अडीच हजार रुपये आहे. तर या तलावातील गाळ वाहून नेण्यासाठी ५०० ते ६०० रुपये खर्च येत आहे. त्यामुळे तलावातील गाळ टाकण्याला शेतकरी प्राधान्य देत असून त्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होत आहे. तलावातील गाळामुळे परिसरातील शेतशिवार गाळयुक्त होत आहे.सकाळपासून लागते मालवाहूच्या रांगातलावातील गाळ सध्या युद्धपातळीवर काढल्या जात आहे. तलाव गाळमुक्त झाल्यास त्यांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. असे असले तरी तलावातील गाळ नेण्यासाठी येथे दररोज सकाळपासूनच ट्रक, ट्रॅक्टर या मालवाहू वाहनांच्या रांगात लागत असल्याचे बघावयास मिळते. विशेष म्हणजे जेसीबीच्या साहाय्याने सध्या गाळ काढला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती