शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

एचआयव्हीची मोफत तपासणी

By admin | Updated: June 28, 2015 02:35 IST

मोफत एचआयव्ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपलब्ध आहे.

वर्धा : मोफत एचआयव्ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपलब्ध आहे. विविध कंपन्यांनीही एचआयव्ही जनजागृती, कामगाराची तपासणी, औषधोपचार आदी सुविधा पुरविण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. नितीन निमोदिया, कार्यक्रम अधिकारी शिवा देवगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानकर, डॉ. बागेश्वरी पाठक, प्रतिभा शेंडे, रवींद्र्र रोकडे, प्रमोद बहुलेकर, वैशाली मैद, रंजन हुमने, नुरूल शेख, मनीष कुटे आदी उपस्थित होते. डॉ. राठोड यांनी एप्रिल ते मार्चदरम्यान २७ हजार १४० व्यक्तींची तपासणी केली. यात २८९ रुग्ण एचआयव्हीसह जीवन जगणारे आढळले असून १७७ पुरूष व ११२ महिला आहेत. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ४४ एचआयव्हीसह जीवन जगणारे आढळले. ५५ हजार ११ गरोदर मातांच्या तपासणीत १६ गरोदर माता एचआयव्हीसह जीवन जगत असून २८ गरोदर मातांची रुग्णालयात प्रसूति करून औषधोपचार देण्यात आला. २०१४-१५ मध्ये एचआयव्हीग्रस्त व्यक्तींमध्ये वर्धा १०६, हिंगणघाट ४१, आर्वी १७, देवळी १७, कारंजा ७, समुद्रपूर ११, आष्टी ६ व सेलू ९ आहेत. या व्यक्तींना ६० टक्के टीबीची शक्यता असते. १ हजार १७९ नोंदणीकृत टीबी रुग्णांची एचआयव्ही तपासणी केली असता ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सर्व रुग्णांना औषधोपचार दिल्याचे सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)