शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वर्ध्यातील सावंगी मेघे रुग्णालयात अवयवदानाची चौथी यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 11:37 IST

मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे.

ठळक मुद्देधनोडीच्या युवकाचे अवयवदानलिव्हर, किडनी प्रत्यारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. यावेळी, नागपूरच्या रुग्णालयासोबतच सावंगी मेघे रुग्णालयातही अवयव प्रत्यारोपण करण्यात आले.आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरपूर येथील रहिवासी सुनील शंकरराव शेराम या ३३ वर्षीय विवाहित तरूणाचा रविवार दि. ३ जून रोजी अपघात झाला. त्याच्या मेंदूला जबर मार बसला. बेशुद्धावस्थेतच त्याला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सुनीलवर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. संदीप इरटवार, डॉ. हेमंत देशपांडे व डॉ. अमोल सिंघम यांनी तपासणी केली असता त्याचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे आढळले. कोणत्याही परिस्थितीत सुनीलचे प्राण वाचण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. तसेच अवयवदानाची माहिती त्यांना दिली. कुटुंबीयांकडून अवयवदानासाठी लेखी स्वीकृती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर व समन्वयक डॉ. रूपाली नाईक यांनी विभागीय प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधून अवयवदानासाठी आवश्यक शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात पार पाडली. त्यानंतर अवयव सुरक्षितरित्या स्थानांतरीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करुन सुनीलचे यकृत (लिव्हर) नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयाकडे सोपविण्यात आले तर एक मुत्रपिंड (किडनी) आॅरेंज सिटी रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली. याशिवाय, एक किडनी व दोन डोळ्यांचे प्रत्यारोपण सावंगी मेघे रुग्णालयाच करण्यात आले. या प्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. एस. देशमुख, डॉ. अभिजित ढाले, डॉ. संजय कोलते, डॉ. मनीष बनवानी, डॉ. इरटवार, डॉ. अमोल बावणे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. सचिन डायगव्हाणे यांचा सहभाग होता.ग्रीन कॉरिडॉरसाठी संस्थेचे विश्वस्त सागर मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी, विभागीय प्रत्यारोपण समितीच्या वीणा वाथोरे यांनी विशेष यंत्रणा उपलब्ध करून दिली. तर, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय गुरव, सावंगी पोलीस ठाण्याच पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. महाकाळकर, गणेश खारोडे, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, रुपाली नाईक, अहमिंद्र जैन, आदित्य भार्गव, परिचारिका निलम खोंडे, सुरक्षा अधिकारी खैरे व चमूचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

टॅग्स :Organ donationअवयव दान