वर्धा : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी निदर्शने दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा दिल्या पाहिजे. यासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सेवेत सामावून घेण्यात यावे, सेवा काळात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास अथवा पत्नीस विना अट सेवेत सामावून घेण्यात यावे. शासकीय सेवा करताना वैद्यकीय कारणास्तव सेवा करणे शक्य होत नसल्यास त्याच्या पाल्यास सेवेत सामावून घेण्यात यावे. प्रदीर्घ काळापासून बदली कर्मचारी म्हणून शासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, रिक्त पदे त्वरीत भरावे, गणवेशासाठी अडीच हजार रूपये मंजुर करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेकरिता तत्पर असताना वेतनात तफावत असल्याने याकडे लक्ष वेधले.(स्थानिक प्रतिनिधी)
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By admin | Updated: January 15, 2015 22:56 IST