शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीकृत बचत गटांना मिळणार चार हजाराचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:34 IST

माविम व उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नोंदणीकृत बचत गटांना ४ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाला बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नोंदणीकृत बचत गटांना व्यसनमुक्ती व दारुबंदी कार्यक्रमाकरिता प्रत्येकी ४ हजार रुपये अनुदान मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत बचत गटांना याचा फायदा होणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.माविम व उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नोंदणीकृत बचत गटांना ४ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ३१ आॅगस्टला आदेशही काढण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे सनियंत्रण पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती करणार असल्याचेही आदेशात नमुद केले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माविम व उमेद अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या महिला बचत गटांना या निर्णयाचा लाभ मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाने या शासन निर्णयानुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस