शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार खोल्या पोलीस ठाण्यासाठीच

By admin | Updated: October 24, 2015 02:07 IST

शहरातील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा चढता आलेख पाहता शहरात दोन नवे पोलीस ठाणे मंजूर झाले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय वर्धा : शहरातील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा चढता आलेख पाहता शहरात दोन नवे पोलीस ठाणे मंजूर झाले आहेत. यातील रामनगर येथील पोलीस ठाणे पालिकेच्या महाराणा प्रताप या शाळेच्या रिकाम्या असलेल्या चार खोल्यात तयार होणार असल्याचा ठराव पालिकेने शुक्रवारी घेतला. यामुळे रामगनर पोलीस ठाणे याच शाळेच्या खोल्यात भरणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.पालिकेच्या मालकीच्या असलेल्या या चार खोल्यात सध्या मदर इंग्लिश स्कूल ही खासगी शाळा भरत आहे. त्या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने सदर शाळेकडून खोल्या रिकाम्या करण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र शाळेकडून या खोल्या रिकाम्या झाल्या नव्हत्या. यावर पालिकेच्यावतीने त्यांना निर्देश दिले तरी काहीच कारवाई झाली नाही. यामुळे पालिकेच्या सभेत या विषयावर चर्चा होवून ती शाळा येथून बंद करून त्या चार खोल्या व परिसर पोलीस ठाण्याकरिता देण्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी) रामनगर येथे पोलीस ठाणे लवकरचशहराचा वाढता आकार व वाढती गुन्हेगारी यावर आळा घालण्याकरिता वर्धा पोलीस ठाण्यासह दोन आणखी ठाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात एक सावंगी (मेघे) व दुसरे रामनगर येथे मंजूर करण्यात आले. मात्र ठाण्याकरिता जागेचा प्रश्न असल्याने पोलीस विभागाकडून रामनगर परिसरात असलेल्या पालिकेच्या या शाळेतील खोल्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र येथे भरत असलेल्या खासगी शाळेचे संचालक ती जागा रिकामी करून देण्यास तयार नव्हते. यामुळे पालिकेत ठराव घेत त्या खोल्या रिकाम्या करण्यात येणार आहे.