शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदेशवारीकरून परलेल्या 75 पैकी चौघे व्यक्ती अजूनही जिल्ह्याबाहेरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करताना ७५ पैकी चार व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतल्याच नसल्याचे पुढे आले आहे. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात न परलेल्यांपैकी दोन व्यक्ती सध्या नागपूर, तर प्रत्येकी एक व्यक्ती मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविडचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन हा उत्परिवर्तीत विषाणू डेल्टा पेक्षाही झपाट्याने आपला प्रसार करीत असल्याने विदेशातून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ट्रेस करून त्याची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्याला विलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, वर्धा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व विदेशवारीकरून परतलेल्या ७५ पैकी तब्बल चार व्यक्ती अजूनही वर्धा जिल्ह्याबाहेरच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तशी नाेंद आरोग्य विभागाने घेतली आहे.वर्धा जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेले ७५ व्यक्ती आतापर्यंत विदेशवारी करून परतल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करताना ७५ पैकी चार व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतल्याच नसल्याचे पुढे आले आहे. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात न परलेल्यांपैकी दोन व्यक्ती सध्या नागपूर, तर प्रत्येकी एक व्यक्ती मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले. या सर्व व्यक्तींची कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विदेशवारीकरून परतलेल्यांपैकी तब्बल १८ व्यक्तींचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्याने व त्यांच्यात कोविडची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना मुक्त करण्यात आले.

२८ व्यक्तींचे घेतले दुसऱ्यांदा स्वॅब-    विदेशवारीकरून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावरच आरटीपीसीआर कोविड चाचणी केली जात आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींचा २४ तासांच्या आता स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर कोविड चाचणीसाठी पाठविल्या जात आहे. आतापर्यंत विदेशवारीकरून परतलेल्या ७५ व्यक्तींचा पहिल्यांदा तर तब्बल २८ व्यक्तींचा दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आठव्या दिवशी घेतला जातो दुसरा स्वॅब-    केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्र स्थानी ठेरून विदेशवारी करून परतलेल्या व विलगीकरणात असलेल्या व्यक्तींचा विलगीकरण कालावधीच्या आठव्या दिवशी दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर कोविड चाचणीसाठी पाठविला जात आहे. आतापर्यंत तब्बल २८ व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले असून, या सर्व व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

विदेशवारीकरून परतलेल्यांपैकी दोघे नागपूर तर प्रत्येकी एक यवतमाळ व मुंबई जिल्ह्यात आहेत. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ओमायक्रॉनचे संकट मोठे असून, कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असल्याने नागरिकांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची व्हॅक्सिन घ्यावी.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या