शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

चार अपघातात तिघे ठार, १० जखमी

By admin | Updated: November 23, 2015 01:47 IST

जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरू झालेली अपघाताची मालिका रविवारीही सुरूच असल्याचे दिसून आले. या दोन दिवसात सेलू, समुद्रपूर आणि वरूड येथे चार अपघात झाले.

जिल्ह्यात अपघातांची मालिका : सेलू, समुद्रपूर आणि वरूड येथील घटना वर्धा : जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरू झालेली अपघाताची मालिका रविवारीही सुरूच असल्याचे दिसून आले. या दोन दिवसात सेलू, समुद्रपूर आणि वरूड येथे चार अपघात झाले. यात तिघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील जाम चौकात उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने रामू हरिभाऊ चुलबुले (३०) रा. शिरूड ता. हिंगणघाट ठार झाला तर उभ्या ट्रकला मागाहून जीपने धडक दिल्याने अनिता रमेश बक्सरे (५२) नामक महिलेचा मृत्यू झाला. यात वाहनातील सात जण जखमी झाले. वरूड येथे भरधाच जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत रमेश कुकडे (३८) रा. वरुड यांचा मृत्यू झाला. सेलू येथे दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला. यात दुचाकीचालकासह कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. जीप दुचाकी अपघातात एक ठारपवनार - पवनार-वरूड रस्त्यावर भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. रमेश कुकडे (३८) रा. वरूड असे मृतकाचे नाव आहे. एम.एच.३२ क्यू ५३८५ क्रमांकाच्या मालवाहू जीपने एम.एच३२ झेड २५५९ या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार रमेश कुकडे (३८) हा जागीच ठार झाला. दुचाकीसह मालवाहू जीप रस्त्यालगत असलेल्या नालीत उलटली.पोलीस सुत्रानुसार, सदर मालवाहू जीप महिलाश्रमकडून सिमेंटचे पोते भरून मोहीकडे जात होती. रमेश कुकडे हा त्याच्या दुचाकीने पवनार वरून वरूडकडे जात होता. दरम्यान रमेश कुकडे हा जीपवर आदळला. यात रमेशचा जागीच मृत्यू झाला. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे दिलीप किटे व मंगेश वाघाडे यांनी लगेच घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेचा तपास सुरू आहे.(वार्ताहर) सेलू- नागपूर-वर्धा मार्गावर कोटंबा- केळझर दरम्यान दप्तरी पेट्रोलपंपाजवळ लोखंडी मोठे दोन लोखंडी बंडल घेवून जाणारा कंटेनर आणि मोटारसायकल यात अपघात झाला. यात कंटेनर उलटला व त्यातील दोनही लोखंडी बंडल घटनास्थळीच पडले. ते जर दूर फेकल्या गेले असते तर मोठी हानी झाली असती. ही घटना रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीचालक अनिल धुर्वे रा. भोसा आणि कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुचाकी क्र. एमएच ३२ डब्ल्यु ९४७५ ने अनिल धुर्वे हा नागपूरकडे जात होता. दरम्यान कंटेनर क्र. एमएच ०६ एक्यु ७८५० हा नागपूर येथून वर्धेकडे येत होता. दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्न हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात होती.