शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार अट्टल चोरटे केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:56 IST

जिल्ह्यात चोºयांचे सत्र सुरू असतानाच सावंगी पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आरोपीमध्ये एका दुचाकी चोरट्याचा तर तीन बकरी चोरांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसावंगी पोलिसांची कारवाई: पाच दुचाकींसह कार, मोबाईल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात चोºयांचे सत्र सुरू असतानाच सावंगी पोलिसांनी सापळा रचून चार अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील आरोपीमध्ये एका दुचाकी चोरट्याचा तर तीन बकरी चोरांचा समावेश आहे. दुचाकी चोरट्यांकडून पाच दुचाकी तर बकरी चोरांकडून कार, मोबाईल व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सय्यद कौंसर सय्यद असरब (२४), मोहम्मद अजहर मोहम्मद अकील (२०), मोहम्मद इरफान मोहम्मद जावेद (१९) सर्व रा. नागपूर असे बकरी चोरांची तर सुमित निरंजन भगत (२६) रा. नांदा जि. यवतमाळ असे दुचाकी चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुमीत भगत याला गोपनीय माहितीच्या आधारे सावंगी पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. प्रारंभीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया चोरट्याला पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जप्त केलेल्या पाच दुचाकींपैकी दोन दुचाकी त्याने सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास केल्या तर तळेगाव, वर्धा शहर व कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली आहे. सावंगी पोलिसांच्या ताब्यात असलेला चोरटा सुमित भगत याला यापुर्वीही अटक केली होती. सावंगी पोलिसात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला एक वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षाही झाली आहे. शिक्षा भोगल्यानंतर बाहेर आलेल्या चोरट्याने पुन्हा चोरीचे सत्र कायम ठेवल्याचे व त्याच्याकडे काही चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या सुमितवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे सुमारे १२ गुन्हे दाखल आहेत.दुसरी कारवाई सावंगी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सालोड-दहेगाव (मि.) मार्गावर केली. संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत विचारणा केली असता तिघेही बकºया चोरी करणारे चोरटे असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कागदपत्र नसलेली एमएच ३१ एच ३४९६ क्रमांकाची कार, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले. तीनही आरोपींनी सिंदी, सेलू व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे ३० बकºया चोरून त्यांची नागपूर येथील एका मांस विक्रेत्याला विक्री केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक पारडकर, रामदास बिसने, प्रदीप राऊत, संघसेन कांबळे, विलास अवचट, मुंडे यांनी केली.