शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

चार तासांत उपोषणाची सांगता

By admin | Updated: March 24, 2015 01:32 IST

पिंपरी (मेघे) येथील पशु अनाथ आश्रमातील प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे

पीपल्स फॉर अ‍ॅनिमलचे पाण्याकरिता तर कामगारांचे विविध मागण्यांकरिता आंदोलन वर्धा : पिंपरी (मेघे) येथील पशु अनाथ आश्रमातील प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल व अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. सदर आंदोलन अवघ्या चार तासात संपुष्टात आले. खासदार रामदास तडस यांनी उपोषणस्थळाला भेट देत दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पशु अनाथ आश्रमामील पशुंना पिण्याच्या पाण्याची सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी तसेच कायमस्वरूपी पाण्यासाठी एक लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून मिळावी, यासाठी पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्यावतीने बेमुदत जल व अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते. याची माहिती खासदार रामदास तडस यांना मिळताच त्यांनी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना पत्र दिले. सोबतच याच वर्षात पिण्याचे पाणी पुरविण्याचे आश्वासन दिल्यामुळे गोस्वामीसह आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. आंदोलनामध्ये एक गायसुद्धा उपोषण मंडपात होती. खा. तडस यांनी गोमातेचे पूजन करून आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविले.पशु अनाथ आश्रमामध्ये पशुकरिता व प्रत्येक तालुक्यांमध्ये पाच लक्ष रुपये खर्च करून गायींसाठी निवारा (काऊशेड) बांधण्यात येणार असल्याचे खासदारांनी यावेळी सांगितले. उपोषण मंडपात पवन बोधनकर, किरण मुकादम, शुभम जळगावकर, व्यंकटेश जकाते, मयूर पत्रे, दीपक तिगरे, उमेश धुमाळे आणि प्रकाश ठाकरे यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी) मनरेगा कंत्राटी कामगार संपावर समस्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, डाटा आॅपरेटर, रोजगार सेवक, युनियनच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले आहे. कमागारांच्या मागण्या मुख्यमंत्री, ग्रामीण विकासमंत्री, अर्थमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपर्यत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे. मनरेगा योजनेतील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर असल्याचे निवेदनात नमूद आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यांना दरमहा ३० हजार रुपये, तांत्रिक अधिकाऱ्यांना दरमहा २५ हजार रुपये, डाटा आॅपरेटर १५ हजार रुपये, ग्रामरोजगार सेवकास दरमहा १० हजार रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात आॅनलाईन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५ तारखेपूर्वी जमा करावे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मनरेगा योजनेचे शासकीय ओळखपत्र तातडीने देण्यात यावे, प्रवास खर्च मिटींग खर्च तात्काळ द्यावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत. सोबतच मनरेगा योजनेतील सर्व जागा स्थायी कराव्या. कामावरील मजुरांनाच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्यावा. मजुरी बँक खात्यात जमा करावी. शेतातील कामे नरेगा योजने अंतर्गत करावी. नरेगा योजनेचा स्वतंत्र विभाग करून पंचायतचे अधिकार काढावे आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी कामगार नेते राजू गोरडे, सत्यजीत काचेवार, सचिन नाईक, राजकुमार कांबळे, विजय पचारे यांच्यासह कमागार उपस्थित होते. (प्रतिनिधी)