शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात पाणी समस्या तीव्र; गोपालक सोडताहेत गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:38 IST

तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देटँकरद्वारे पाणीपुरवठा नाहीच । १७ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.संपूर्ण तालुक्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून १७ गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे पाणी पेटल्याचीच स्थिती आहे. आचारसंहितेमुळे ग्रा.पं. ला टँकर सुरू करण्यासाठी ठराव घेता येत नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील निद्रिस्त आहेत. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणीदेखील ते करायला तयार नाहीत. तालुक्यातील चोपण, ब्राह्मणवाडा, गारपीट, धामकुंड, सेलगाव (उमाटे) येथील कित्येक गोपालक गाव सोडून गेले असून अनेक गोपालक पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात एकमेव खैरी धरण कोरडे पडले असून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.धरणाशेजारील गावांंमध्ये पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. मात्र कुणाचेही लक्ष नाही. कारंजा शहरामध्येसुद्धा सहा ते सात दिवसानंतर नळ येत आहेत. खासगी टँकरचे भाडे देणे सर्वसामान्य जनतेला झपावणारे नाही. शहरातील सार्वजनिक नळावर रात्रीच्या वेळेस अनेक पाईप पडलेले असतात. यातून कित्येक लिटर पाणी वाया जात आहे.अनेकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते कुटुंबाला नातेवाईकांकडे सोडून एकटे राहणे पसंत करीत आहेत. चारा डेपोअभावी चारा गंभीर समस्या बनली आहे. याविषयी तहसीलदार सचिन कुमावत यांनी सांगितले की, खैरी डॅममध्ये जूनपर्यंत पुरेल एवढा १८ ते २० टक्के जलसाठा साठवून ठेवला असून शासनाने विदर्भात चारा डेपो सुरू केलेले नाहीत.टँकर सुरू करण्याबाबत निर्देश पंचायत समितीकडून आलेले नाहीत. पाणी समस्येवर मात करण्याकरिता आॅक्टोबर महिन्यापासून सुरूवात करायला पाहिजे. पाणी समस्येकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, असे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी