शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी पाया मजबूत असावा

By admin | Updated: August 12, 2016 01:42 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

अंकित गोयल : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची कार्यशाळा वर्धा : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला पाया मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी दुसऱ्याचे अनुकरण न करता स्वत: सकारात्मक दृष्टीने विचार करून अभ्यास केल्यास यशाचे शिखर गठाण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या कार्यशाळेत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची कार्याशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सहायक उपजिल्हाधिकारी स्वप्नील तागडे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे प्रोफेसरी अधिकारी वैभव गावंडे, नियोजन विभागाचे लेखाधिकारी प्रतापराज म्हसाळ, शासकीय जिल्हा ग्रंथपाल अ.नि. मंडपे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी चालू घडामोडीबाबत पुस्तके वाचावित. यासाठी वर्तमानपत्रे, मासिके, न्यूज चॅनल यासारख्या माध्यमाचा उपयोग करून घ्यावा. तसेच गणित, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान या पुस्तकाचा जास्त प्रमाणात अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, असा सल्ला गोयल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळा मार्गदर्शन वर्ग चालविण्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात काय करायचे आहे. याचे आधी नियोजन आताच करणे गरजेचे असून जीवनात काय साध्य करायचे आहे. त्याचे एक लक्ष ठेवून कार्य करावे. यासाठी आपण सर्व समाजाचा विकास करण्याचे ध्येय ठेवत सकारात्मक विचार करून समाजात बदल घडवून आणण्याचे कार्य करावे, असे ही ते म्हणाले. सहायक उपजिल्हाधिकारी स्वप्नील तागडे, वैभव गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामाकाजाची माहिती होण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत प्रेरणा मिळावी यासाठी निवड समितीद्वारे एका विद्यार्थ्यांनी निवड करण्यात येते. त्याला जिल्हाधिकारी किंवा उच्च दर्जाच्या प्रशासनिक अधिकाऱ्यासोबत दिवसभर राहून प्रशासनिक कामकाजाचा अनुभव दिला जातो. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या कार्यशाळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व भारतीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेली दिपाली जैस्वाल या विद्यार्थिनीची समितीने निवड केली असून २० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दिवसभर राहून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेणार आहे. कार्यशाळेला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)