शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पवनारसह येळाकेळीला येणार छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाप्पाच्या विसर्जनासाठी नजीकच्या येळाकेळी व पवनार येथे गणेश भक्त एकच गर्दी करतात. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर दोन्ही गावांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा अंतिम आराखडा पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तामुळे पवनार व येळाकेळी येथील धाम नदीपात्राला पोलीस ...

ठळक मुद्देविसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात : १०० गृहरक्षकांचे घेणार सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाप्पाच्या विसर्जनासाठी नजीकच्या येळाकेळी व पवनार येथे गणेश भक्त एकच गर्दी करतात. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर दोन्ही गावांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा अंतिम आराखडा पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तामुळे पवनार व येळाकेळी येथील धाम नदीपात्राला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. यंदा दोन्ही ठिकाणच्या बंदोबस्तासाठी एकूण १०० गृहरक्षक दलाच्या जवानांचे सहकार्य घेतले जाणार आहे.वर्धा-आर्वी मार्गावरील येळाकेळी व वर्धा-नागपूर महामार्गावरील पवनार येथे वर्धा शहरासह परिसरातील नागरिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी जातात. विसर्जन सोहळ्याच्या दोन दिवसात सदर दोन्ही गावांमध्ये गणरायाच्या भक्तांचा मळाच फुलतो. या उत्सवादरम्यान वर्धा-नागपूर व वर्धा-आर्वी मार्गावरील वाहतूक खोळंबू नये म्हणून सेवाग्राम व सावंगी (मेघे) पोलिसांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे.पवनार येथे अनुचित घटना टाळण्यासाठी यंदा सेवाग्राम पोलीस पाच जलतरणपट्टू, ४० पुरुष गृहरक्षक व १५ महिला गृहरक्षक तसेच पोलीस मित्रांचे सहकार्य घेणार आहेत. यंदा पवनार येथील बंदोबस्ताकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाने सेवाग्राम पोलिसांना दोन दिवसांसाठी अतिरिक्त ४ पोलीस अधिकारी, ३५ कर्मचारी, सात महिला पोलीस कर्मचारी दिलेले आहेत. तर येळाकेळी येथील बंदोबस्ताकरिता सावंगी पोलिसांना अतिरिक्त ३५ पुरुष गृहरक्षक, १० महिला गृहरक्षक, १३ पोलीस कर्मचारी व ३ महिला पोलीस कर्मचारी दिले आहेत. याशिवाय दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दोन्ही ठिकाणी विसर्जन उत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी दोन दिवस खडा पहाराच देणार असल्याचे सांगण्यात आले.यंदाही भाविकांना नदीपात्रात प्रवेश नाहीचपवनार येथे मूर्ती विसर्जनासाठी भाविक एकच गर्दी करतात. या उत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी नेमूण दिलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही मूर्ती विसर्जनासाठी नदी पात्रात उतरता येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे. विसर्जनासाठी नदी पात्र परिसरात युवा ब्रिगेटचे कार्यकर्ते, स्थानिक भोई समाज बांधव व सुमारे १५ पोलीस मित्रांचे सहकार्य घेण्यात येणार आहेत. त्यांच्याच सहकार्याने भाविकांनी मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहनही सेवाग्राम पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.च्पवनार व येळाकेळी येथे अस्थायी पोलीस चौकी तयार करून तेथून वेळोवेळी भाविकांसह नागरिकांना आवश्यक सूचना पोलिसांच्यावतीने करण्यात येणार आहे. यात निर्माल्य नदीत न टाकणे तसेच नदीच्या पाण्याची कुठल्याही भाविकाने जाऊ नये अशा सुचनांचा समावेश आहे.पवनार येथे विसर्जन उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आपण १० वाहतूक पोलीस कर्मचाºयांची मागणी केली आहे. वाहतूक प्रभावीत होऊ नये म्हणून नागपूरकडून वर्धेच्या दिशेने व वर्धेकडून नागपूरच्या दिशेने जाणारे वाहने पवनारच्या मोठ्या पुलावरून ये-जा करणार आहेत. तर मूर्ती विसर्जनाकरिता येणाºयासाठी छोट्या पुलावरून व्यवस्था करण्यात आली आहे.- आर. व्ही. मेंढे, ठाणेदार,पो.स्टे. सेवाग्राम.येळाकेळी येथील धाम नदी पात्रात मूर्ती विसर्जनासाठी सुमारे ३५ पोलीस मित्रांचे सहकार्य घेतले जाणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी त्यांच्याशिवाय कुणालाही नदीपात्रात उतरता येणार नाही. पोलीस मित्र मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना सहकार्य करणार आहेत.- संतोष शेगावकर, ठाणेदार, पो.स्टे. सावंगी (मेघे)घरगुती नंदीघाटावर तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन छत्रीघाटावरपवनार येथे विसर्जनासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याने धाम नदी पात्राला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही घरगुती गणपतीचे विसर्जन नंदी घाटावर तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन छत्रीघाटावर होणार असल्याचे सांगण्यात आले.निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्थानदी प्रदूषित होऊ नये म्हणून पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्र परिसरात निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या निर्माल्यकुंडात भाविकांनी निर्माल्य टाकावे, असे आवाहन काही सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रा.पं. प्रशासन करणार आहे.वाहतूक खोळंबणार नाही याची घेणार दक्षताविसर्जन उत्सवादरम्यान पवनार येथे वर्धा-नागपूर महामार्गावरील वाहतूक प्रत्येक वर्षी खोळंबत असल्याचे वास्तव आहे. यंदा कुठल्याही परिस्थितीत या मार्गावरील वाहतूक खोळंबणार नाही याची दक्षता सेवाग्राम पोलीस घेणार आहेत.५२ सार्वजनिक तर १,५९२ घरगुतीचे बाप्पाचे विसर्जनवर्धा शहर, सावंगी (मेघे), रामनगर व सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण ५२ सार्वजनिक तर १ हजार ५९२ घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन नजीकच्या पवनार व येळाकेळी येथील धाम नदी पात्रात होणार आहे.