शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एक ईव्हीएम मशीन केंद्रातच विसरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:59 IST

मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डांपैकी एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात टाकून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले. झालेला प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधितांशी संपर्क केला, रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला.

ठळक मुद्देकेंद्राध्यक्षाची लगीनघाई : मोरांगणा ग्रा.पं. तील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डांपैकी एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात टाकून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले. झालेला प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधितांशी संपर्क केला, रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला.येथील ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत पार पडावे म्हणून चार वर्ग खोल्यांमध्ये चार वॉर्डांच्या ईव्हीएम ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन सिल करण्यात आल्या. काही वेळाने ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनात बसून अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. मात्र, घाईगडबडीत वॉर्ड क्रमांक एकची मशीन घेऊन जायचे विसरले.गावातील काही मंडळींनी काही राहून तर गेले नाही ना म्हणून वर्ग खोलीत डोकावून पाहिले असता वॉर्ड क्र. १ च्या खोलीत ईव्हीएम मशीन आढळून आली. याबाबत हल्लकल्लोळ झाला. काहींनी आमदार अमर काळे यांच्या कानावर तर काहींनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली तेव्हा कुठे रात्री ८.३० वाजता एका वाहनातून एक कर्मचारी आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला.याबाबत तहसीलदार पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मागाहून झोनल मॅनेजर येणार होते व टीमला सोबत नेणार होते. पण, नेमकी एकच ईव्हीएम मशीन का ठेवली या प्रश्नाचे त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.तीन वॉर्डाच्या ईव्हीएम मशीन घेऊन अधिकारी गेले व एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन तेथेच राहून गेली. त्यामुळे तहसीलदारांना माहिती दिली व तिथे ठिय्या मांडून बसलो. राहिलेली ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी कोणताही जबाबदार कर्मचारी आला नाही. केवळ वाहनचालक आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला. त्यामुळे गडबड तर झाली नाही ना अशी शंका आहे.- श्यामकांत उमक, रा. मोरांगणा (ख).