शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अंगणवाडी सेविकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:54 IST

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मानधनवाढीचे परिपत्रक दि. २३ फेब्रुवारीला काढलेले आहे;पण या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी सुद्धा नमूद केल्या आहेत.

ठळक मुद्देमागण्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मानधनवाढीचे परिपत्रक दि. २३ फेब्रुवारीला काढलेले आहे;पण या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी सुद्धा नमूद केल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाचक ठरणाºया अटी रद्द करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.पटसंख्येच्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्या बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा. सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकामधील जाचक ठरणाºया सर्व अटी रद्द करण्यात याव्या. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी. तसेच अंगणवाडीत शासनाकडून येत असलेला टी.एच.आर. बंद करावा व महिला बचत गटातर्फे पुरक पोषण आहार देण्यात यावा. आहार देणाबाबत नव्याने ई-टेंडरिंंग न करता पूर्वी प्रमाणे ते सुरू ठेवण्यात यावे. पुरक पोषण आहाराचा दर ६ रुपये वरुन किमान १५ रुपये करावा. मे २०१७ पासून पुरक पोषण आहाराची देयके प्रलंबित आहेत, ते त्वरीत अदा करावी, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. येत्या काही दिवसात मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व गुंफा कटारे, कल्पना चहांदे, आशा मिसाळ, सुनंदा महाजन, उषा मानकर, संगीता कोहळे, शुभांगी कलोडे, ज्योती हिवराळे, प्रमीला वानखेडे यांनी केले. आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.