शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचे अधिकारी पोहोचले बाभूळबनात

By admin | Updated: January 25, 2017 00:54 IST

हिंगणी वन परिक्षेत्रातील सुरगाव नजीकच्या नागटेकडी शिवारात बाभुळबनाचा चोरट्यांनी सफाई केली

संशयित ताब्यात : बुंध्याचे मोजमाप व हॅमरिंग, घटनास्थळावर केवळ ट्रकभर लाकडे आकोली : हिंगणी वन परिक्षेत्रातील सुरगाव नजीकच्या नागटेकडी शिवारात बाभुळबनाचा चोरट्यांनी सफाई केली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच झडशीचे क्षेत्र सहाय्यक जी.एस. कावळे, सेलूच्या क्षेत्र सहाय्यक ए.टी. लटपटे, वनरक्षक सी.पी. नागरगोजे, बी.पी. पर्वत व विनायक गाऊत्रे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे तपास करीत आहेत. नागटेकडी भागातील बाभुळबनात गत दोन महिन्यांपासून बाभळीच्या झाडांची कत्तल सुरू होती. वन व महसूल विभागाच्या सर्व्हे क्र. १५, १६ व १७ मध्ये बाभळीची मोठी झाडे होती. ही झाडे कटर व आराच्या साह्याने कापून लागलीच ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात होती. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली आणि चोरट्यांचे बिंग फुटले. सदर प्रकरणी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाभूळबनात दाखल होत कापलेल्या झाडांचे मोजमाप, बुंध्याचे मोजमाप करून हातोडा मारण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे यांनी आरोपींची शोधमोहीम राबवून संशयित म्हणून संदीप रामकृष्ण सहारे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याशिवाय इतर सकाऱ्यांनी कोणत्या वाहनाने लाकडाची वाहतूक केली, या बाबींचा उलगडा होणार नाही. आता या प्रकरणात वन विभागाचे अधिकारी कोणत्या दिशेने तपास करतात, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लाकूड चोरीतील चोरटे वन विभागाच्या गळ्याला लागणार की नाही, त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर) संशयित आरोपी करीत होता शेतकऱ्यांना दमदाटी या प्रकरणातील संशयित आरोपी हा शेतकऱ्यांना दमटाती करीत होता. एकाला मारहाणसुद्धा केली होती. घटनास्थळावर गेलेल्या गावातील दोघांना सोमवारी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे यातील एकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. वन विभाग व महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे दोन नंबरच्या पैशातून दादागिरी फोफावत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते.