लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते. गत सात महिन्यात वनविभागाने १ हजार ५०१ प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरवित त्यांना १ कोटी ५ लाख ३९ हजार ११२ रुपयांची आर्थिक मदत केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.वन्यप्राण्यांकडून जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या जात असल्याने शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतातील उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या सुमारास शेतातच मुक्काम करीत असल्याचे वास्तव आहे. बहूदा जंगल परिसर सोडून शेतशिवारात येणारे वन्यप्राणी शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या बैल, शेळी, गाय आदी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवितात. वन्यप्राण्यांकडून सदर पाळीव प्राण्यांना जखमी अथवा ठार केल्या जाते. शिवाय उभ्या पिकांची नासडीही वन्यप्राणी करीत असल्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नेहमीच शेतकरी करतात.सध्याच्या विज्ञान युगात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना वनविभागाकडे नसल्याचे बोलले जाते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानीपोटी वनविभागाने तीन हजार ६१० प्रकरणे पात्र ठरवित नुकसानग्रस्तांना २ कोटी १५ लाख ४९ हजार ७८४ रुपयांची शासकीय मदत दिली. त्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना वनविभागाच्यावतीने आठ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली होती.यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात वनविभागाने नुकसानग्रतांना नुकसान भरपाईपोटी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असली तरी विविध वन्यप्राणी शेतशिवारापर्यंत येणार नाही यासाठी विशेष प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा हवालदील झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना वनविभागाकडून आहे.संत्रा उत्पादकांना प्रती झाड २,४०० रूपयांची मिळतेय मदतजिल्ह्यातील आर्वी, कारंजा, आष्टी तालुक्यासह काही भागातील शेतकरी बºयापैकी संत्रा पिकाचे उत्पन्न घेतात. वन्यप्राण्यांनी संत्रा व मोसंबी झाडाचे नुकसान केल्यास नुकसानग्रस्त शेतकºयाला संत्रा व मोसंबीचे प्रती झाड २ हजार ४०० रुपये नुकसानभरपाई दिली जात असल्याचे सांगण्यात आले.२०१६-१७ मध्ये दिली १.१० कोटींची मदतवनविभागाने सन २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ६९९ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरवून १ कोटी १० लाख ३६ हजार ९२६ रुपयांची शासकीय मदत नुकसानग्रस्तांना दिली आहे. यात शेतीच्या नुकसानीची एक हजार ६०३, पशुधन हानीची ७२ तर मनुष्य जखमी झाल्याच्या २३ प्रकरणांचा समावेश होता.जंगली श्वापदांनी १८ मनुष्यांना गंभीर करीत दोघांना केले ठारवन्यप्राण्यांनी यंदा एप्रिल ते आॅक्टोंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांवर हल्ला चढवित १८ मनुष्यांना जखमी केले. शिवाय दोन जणांना ठार केले. दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागाने प्रत्येकी ८ लाखांची मदत तर १८ जखमींना एकूण ११ लाख ९३ हजार ५७७ रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याच कालावधीत १ हजार ३९४ शेतपिकांच्या नुकसानीची प्रकरणे पात्र ठरवित शेतकºयांना ७० लाख ४९ हजार १७० रुपये तसेच पशुधन हानीचे ८७ प्रकरणांसाठी ६ लाख ९६ हजार ३७५ रुपये शासकीय मदत म्हणून दिली आहे.
वन विभागाकडून नुकसानग्रस्तांना १.५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:56 IST
वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते.
वन विभागाकडून नुकसानग्रस्तांना १.५ कोटी
ठळक मुद्देसात महिन्यांत १,५०१ जणांना मिळाला दिलासा