शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:19 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असा दारूबंदी झोन राज्य सरकारने तयार केला आहे. या जिल्ह्यात अवैध दारू विक्रीतून जप्त करण्यात आलेले दारूचे नमूने तपासण्यासाठी फॉरेन्सीक लॅब उपलब्ध करून देण्यात येणार होती.

ठळक मुद्देकेसेससाठी विलंब : तीनही जिल्ह्यातील नमूने जातात नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असा दारूबंदी झोन राज्य सरकारने तयार केला आहे. या जिल्ह्यात अवैध दारू विक्रीतून जप्त करण्यात आलेले दारूचे नमूने तपासण्यासाठी फॉरेन्सीक लॅब उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र याबाबत शासन स्तरावरून कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने आजही नमूने नागपूर येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठविले जात आहे. तेथून अहवाल येण्यास किती कालावधी लागेल, याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे न्यायालयात दारूचे प्रकरणे दाखल झाल्यानंतर अहवालास विलंब होत असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवरही या बाबींचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.राज्यात वर्धा जिल्ह्यात सर्व प्रथम दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर १९९२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली. १५ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात सरकारमान्य दारूचे दुकाने बंद करण्यात आले. त्याचबरोबर अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर वाढली. या तीनही जिल्ह्यात अवैध दारूच्या व्यापारात ५० हजारांवर लोक गुंतलेले आहेत. दररोज शेकडो लिटर दारू जप्त केली जात आहे. पोलीस जप्त करण्यात आलेली दारु तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवित असते. नागपूर विभागात नागपूर येथे ही लॅब आहे. संपूर्ण विदर्भातून येथे नमूने तपासणीसाठी येतात. ते सर्व गुन्ह्यांच्या संबंधीचे असतात. त्यामुळे तीन जिल्ह्यातून जाणारे दारूचे नमूने तपासून त्याचा अहवाल संबंधीत पोलीस ठाण्यांना पाठविण्याचे कामही याच यंत्रणेला करावे लागते.राज्यसरकारने चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी केली. त्यावेळी तीनही जिल्ह्यासाठी मिळून एक फॉरेन्सीक लॅब देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र हा निर्णय अद्यापही झालेला नाही. मध्यंतरी फिरती फॉरेन्सीक लॅब देण्याबाबतही घोषणा करण्यात आली होती; मात्र ती कागदावरच राहिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने दारू पकडली व न्यायालयात आरोपींविरूध्द खटला दाखल केला. तरी दारूसंदर्भातील अहवाल प्राप्त न झाल्याने बरेचवेळा आरोपींना जामीन मिळण्यास मदत होते. पोलीस यंत्रणेचा तपास वाया जातो. त्यामुळे दारूच्या केसेसमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी फॉरेन्सीक लॅबचा अहवाल महत्त्वपूर्ण दुवा आहे. त्या दृष्टीने या तीन जिल्ह्यांसाठी तातडीने फॉरेन्सीक लॅब सुरू होणे आवश्यक आहे. याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे.११ हजार २९४ गुन्हे दाखलजिल्ह्यात दारूबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केल्या जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यंदाच्या सत्रात जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण ११ हजार २९४ गुन्हे दाखल झाले आहेत. यात गावठी दारूच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. यातील अनेक प्र्रकरणाचा तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आहे.हिंगणघाट मध्यवर्ती ठिकाणचंद्रपूर व वर्धा या दोन जिल्ह्यांना हिंगणघाट हे मध्यवर्ती ठिकाण ठरू शकते. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबची निर्मिती हिंगणघाट शहरात केल्यास दोन्ही जिल्ह्याच्या केवळ दारूसंबंधीच्या केसेसचे नमूने येथे पाठविता येवू शकतात. व त्याचे अहवालही तातडीने मिळविता येवू शकतील. मात्र या दृष्टीकोणातून राजकीय व प्रशासकीय पाठपुरावा झाला पाहिजे. त्याचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रश्न सध्यातरी थंडबस्त्यात पडला आहे.अहवालाकरिता किमान तीन महिनेपकडलेल्या दारूचे नमूने पाठविल्यानंतर त्याचा अहवाल येण्याकरिता किमान तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे कारवाईला या काळाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे.दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अशी लॅब महत्त्वाची आहे. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दारू वर्षाकाठी पकडली जाते. मात्र यात कारवाईकरिता अहवालाचा विलंब एक कारण ठरत आहे. यामुळे दारूबंदीच्या जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा देणे गरजेचे आहे.- पराग पोटे, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा.दारूबंदीच्या प्रकरणात दारूच्या रासायनिक तपासणीचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. या अहवालास विलंब झाल्यास आरोपी सुटण्याची शक्यता असते. यामुळे पोलिसांकडून हा अहवाल मिळविण्याकरिता चांगलीच धावपळ करावी लागते. अशी लॅब जिल्ह्याला मिळाल्यास तपास सोपा होवून शिक्षेचे प्रमाण वाढेल.- अ‍ॅड. विनय घुडे, सहायक शासकीय अभियोक्ता .