वर्धा : रामनगर पोलिसांनी गौरक्षण वॉर्ड येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली. इतकेच नव्हे तर दोन दारू तस्करांना अटक केली आहे. दीपक हरिदास गजभिये (४०) रा. गौरक्षण वॉर्ड व गजानन कवडू ठाकरे (३०) रा. काजळसरा ता. देवळी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ५१ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे.विदेशी दारूची जिल्ह्याबाहेरून आयात करून त्याची चढ्या दरात विक्री केली जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दीपक गजभिये याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय दीपक गजभिये व गजानन ठाकरे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप, ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र वैरागडे, उदयसिंग बारवाल, कमलेश बडे, आकाश चुंगडे, लोभेश गाडवे, नितेश पाटील, विजय हारनुर, जनार्धन सहारे आदींनी केली.
विदेशी दारूची तस्करी करणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST
विदेशी दारूची जिल्ह्याबाहेरून आयात करून त्याची चढ्या दरात विक्री केली जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दीपक गजभिये याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे.
विदेशी दारूची तस्करी करणारे दोघे जेरबंद
ठळक मुद्दे५१ हजारांचा दारूसाठा जप्त