शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात फुटबॉल फिवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:20 IST

महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात वर्धेत शुक्रवारी सर्वत्र फुटबॉल फिवर चढल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देक्रीडा संकुलावर विद्यार्थ्यांची गर्दी : जिल्हाधिकारीही सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात वर्धेत शुक्रवारी सर्वत्र फुटबॉल फिवर चढल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी आज फुटबॉल खेळताना दिसून आले. या अभियानाचा शुभारंभ वर्धेतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झाला.शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत या अभियानांतर्गत फुटबॉल खेळावयाचा होता. याकरिता एकूण ४०९ शाळांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला तीन असा एकूण १ हजार २२७ फुटबॉलचा पुरवठा करायचा होता. त्याचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले; मात्र नियोजनात गडबड झाल्याने ग्रामीण भागातील शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फुटबॉलचा वापर करून अभियानात सहभाग नोंदविला.या अभियानाकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल तसेच फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर होते. यावेळी महाराष्ट्र शासनाचा जिजामाता व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.यावेळी विविध शाळा, महाविद्यालये, जिल्हास्तर क्रीडा संघटना, फुटबॉल संघटना, डॉक्टर्स संघटना, लॉयन्स क्लब, युवक व महिला मंडळे, क्रीडा मंडळे तसेच विविध वयोगटातील फुटबॉल प्रेमी पुरूष, महिला व खेळाडुंनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी स्टेडीयमवरील सर्वांनाच फुटबॉल खेळण्याचा मोह आवरला नाही व यामुळे स्टेडीयम मैदानावर फुटबॉल फेस्टिवलचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, तालुका क्रीडा संकुलातही स्पर्धा झाल्या.कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा अधिकारी चारूदत्त नाकट, रवींद्र काकडे, विजय डोबाळे, दर्शना पंडित, चैताली राऊत, डॉ. चौधरी, हेमंत वडस्कर, क्रीडा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच अब्दुल सईद, फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी व रामकृष्ण रहाटे, एहेतेशाम शेख, विजय बिसने आदींनी केले.ग्रामीण भागातील शाळांत फुटबॉल पोहोचले नाहीशासनाच्या या अभियानात जिल्ह्यात निवड झालेल्या प्रत्येक शाळेत फुटबॉल पोहाचविण्यात येणार होते. मात्र कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत या शाळांत फुटबॉल पोहोचले नाही. यामुळे शासनाच्या या अभियानाला येथे खो दिल्याचे दिसून आले आहे. शाळांत राबविण्यात आलेल्या या अभियानात सहभागी होण्याकरिता शाळांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधारावरच हे अभियान राबविण्यात आले.४०९ पैकी किती शाळेत मैदान ?मिशन फुटबॉल १ मिलियन या अभियानात एकूण ४०९ शाळांचा समावेश करण्यात आला. यापैकी किती शाळेत फुटबॉल खेळण्याकरिता मैदान आहे अथवा नाही याचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. फुटबॉल खेळण्याकरिता मैदान आवश्यक असताना केवळ २० बाय ३० मिटर जागा आणि दोन खांब एवढी जागा उपलब्ध असल्यास फुटबॉल खेळणे शक्य असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.