सुरेंद्र डाफ। लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी पेरणी योग्य पावसाशिवाय तालुक्यात समाधानकारक पावसाचे आगमन न झाल्याने आर्वी उपविभागीय १९ लघुतलाव, नदीनाले आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाने पाण्याअभावी तळ गाठला आहे. तर देऊरवाडा येथील वर्धा नदीचे पात्र पहिल्यांदाच यावर्षी कमी पावसामुळे उघडे पडले आहे. तर जंगलात नदीनाल्यांनाही पाण्याचा थेंब नसल्याने नदीनाले जुलै महिन्यातही कोरडे आहे. अशातच १५ जुलैच्या दुपारी आर्वीतील वर्धा मार्गावरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पाण्याच्या शोधात चक्क मोराने दर्शन दिल्याने पावसाचे तालुक्यातील संकट अधिक गडद झाल्याचे चित्र आहे. तर हवामान विभाग आता २३ जूननंतरच पाऊस येणार असल्याचे सांगत आहे.आर्वी उपविभागातील कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा, उमरी, टेंभरी, आंजी, दहेगांव, कुºहा रोठा एक, रोठा दोन, महकापूर, आष्टी, पिलपूर, हºर्हासी, कन्नमवार ग्राम, परसोडी या १९ लघुतलाव गेल्या एक महिन्यांपासून पावसाअभावी कोरडे पडल्याने जनावर व वन्यप्राण्यासाठीचे संकट बिकट झाले आहे. तर या लघुकालव्यावर कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत एक महिना विलंबाने पावसाचे आगमन झाल्याने व मागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात अर्ध्यावर पाऊस झाल्याने सर्वत्र पावसाची आतूरतेने वाट पहाणे सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याची टंचाई त्यात जनावरांना पाणी नाही, पाणी पातळी खोल गेली, पावसाअभावी नद्या, नाल्या ओस पडल्याने शेतकरीही अडचणीत आहे.
निम्न वर्धा धरणाने पावसाअभावी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:45 IST
महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी पेरणी योग्य पावसाशिवाय तालुक्यात समाधानकारक पावसाचे आगमन न झाल्याने आर्वी उपविभागीय १९ लघुतलाव, नदीनाले आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाने पाण्याअभावी तळ गाठला आहे. तर देऊरवाडा येथील वर्धा नदीचे पात्र पहिल्यांदाच यावर्षी कमी पावसामुळे उघडे पडले आहे.
निम्न वर्धा धरणाने पावसाअभावी गाठला तळ
ठळक मुद्देवर्धा नदीचे पात्र पडले उघडे : १ महिन्यापासून उपविभागीय लघुतलाव कोरडा