शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘फॉडर कॅफेटेरिया’ प्रकल्प पाण्याअभावी मरणपंथाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:20 IST

ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या २० गुंठे जागेची फॉडर कॅफेटेरियाचे बेणे (चारा) लागवडीसाठी निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्देसाडेसहा लाखांचा खर्च : गुरांच्या चाऱ्याच्या प्रश्न भेडसावणार

योगेश वरभे ।लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या २० गुंठे जागेची फॉडर कॅफेटेरियाचे बेणे (चारा) लागवडीसाठी निवड करण्यात आली होती.९ मार्च २०१६ रोजी शासनाच्या वतीने फॉडर कॅफेटेरियाचा प्रकल्प राबविण्याचा आदेश देण्यात आला होता. झाशी व हैदराबाद येथील २७ प्रजातींच्या चाºयाची रोपे आणून लावण्याते आली, जेणेकरून गोपालकांच्या चाराटंचाईवर मात करून उत्पन्नवाढीसही मदत होईल.परंतु, अल्लीपूर येथील एका जागेवरील चारा प्रकल्प पाण्याअभावी कोरडा पडला असून अखेरच्या घटका मोजत आहे. दवाखान्यात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे विहीर, विंधन विहीर पाणी नसल्याने रोपे वाळू लागली आहे. तातडीने नवीन कूपनलीकेची व्यवस्था केल्यास उन्हाळ्यात चारा उपलब्ध होईल तसेच बेणेही शेतकºयांना उपलब्ध होईल, अन्यथा उन्हाळ्यात दुधाळू जनावरांची हेळसांड होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात घट येईल. कारंजा येथे एक लाख बेणे, हिंगणघाट येथे ८० हजार, समुद्रपूर येथे ९० हजार बेणे वितरित करण्यात आले होते. आता मात्र वाळलेले बुंधे तेवढेच शिल्लक राहिलेले आहेत.चाराटंचाईवर मात करण्यासोबतच भरपूर दूध आणि त्या माध्यमातून गोपालकही समृद्ध व्हावेत या अनुषंगाने बेण्यांची लागवड करण्यात आली. मात्र, महत्त्वपूर्ण या प्रकल्पाला पाण्याअभावी फटका सहन करावा लागत आहे.दवाखान्यात पाण्याचे मुबलक साधन उपलब्ध नसल्यामुळे चाºयाला पाणी देणे शक्य होत नाही. कूपनलिकेला पाणी नसल्याने येथे पाणीटंचाई आहे.- डॉ. अमित लोहकरे, पशुधन विकास अधिकारी, अल्लीपूर.चारा बेणे दवाखान्यात उपलब्ध नसल्याने दुधाळू जनावरांना अडचण येत आहे. बेण्याला मुबलक व २४ तास पाणी देणे गरजेचे आहे.- अरविंद साखरकर, दुग्ध उत्पादक शेतकरी, अल्लीपूर.