शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कवितांच्या प्रेमबंधाने फुलले वृद्धाश्रमातील सुरकुतलेले चेहरे

By admin | Updated: July 1, 2017 00:35 IST

आधुनिक काळात माणसाची विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. यात नातेसंबध दुरावत असल्याचे दिसून येते.

मातोश्री वृद्धाश्रमात कवी संमेलन व वृक्षारोपण : कवितेच्या माध्यमातून मांडल्या व्यथा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आधुनिक काळात माणसाची विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. यात नातेसंबध दुरावत असल्याचे दिसून येते. वृद्धापकाळात मुलांनी मातापित्याचे पालन करावे ही सामाजिक व संवैधानिक बांधिलकी आता संपत असल्याचे निदर्शनास येते. वृद्धांच्या समस्याही जटील होत आहे. संवदेनशील मन दु:खांना समजून घेऊअ शकते. त्यांच्या व्यथा मआंडून त्यांच्या चेहऱ्यावर काही काळासाठी हसू फुलविणारे ठरू शकते याचा प्रत्यय नुकताच आला. राष्ट्रीय कवी कला मंच, वर्धा यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमात निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्यात आले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ होते तर प्रमुख पाहुणे डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, प्रा. दत्तानंद इंगोले, प्रभाकर पाटील, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सुरेश परसोडकर, राष्ट्रीय कवी कला मंचाचे संयोजक रमेश खुरगे उपस्थित होते. कविसंमेलनात विविध आशयाच्या कविता सादर करण्यात आल्या. प्रा. प्रमोद नारायणे यांनी ‘तीर्थरुप आई बाबास’ या कवितेतून ‘बाबा तुम्ही ठरलात कालबाह्य भूतकाळ, वर्तमानाच्या आभासी जगात वापरतांना भविष्याची भरमसाठ डिपॉझिट करण्याच हव्यास सोडत नाही, आमचा पिच्छा, म्हणूनच तुमच्या अस्तित्वाला आम्ही लोटत असतो दूर’ अशी दोन पिढ्यातील तफावत विशद करणाऱ्या कवितेतून वृद्धांचे जीवन वास्तव्य मांडले. रमेश खुरगे यांनी ‘जंजीर’ कविता सादर केली. ‘शादी के बाद शेर को, उसने कुत्ता बना दिया, जो दहाड रहा था, आज दुम हिला रहा’ अशा शब्दात कुटुंब व्यवस्थेचे वास्तव मांडले. सुनील सावध यांनी ‘कुणी तरी हवं वाढदिवसाला’ या शीर्षकाची ‘मैदान जिंकावे म्हणतो कितीदा वाढदिवसाला’ कविता सादर केली. तर मीरा इंगोले यांनी शेतकऱ्यांची आत्महत्येचे कारण सांगतांना सावकारी कर्ज फेडता न आल्याने जप्ती साहेबांची येता मरणा कवटाळले’ अशा आशयाची कविता सादर केली. प्रा. जनार्दन ददगाळे यांनी ‘क’च्या कवितेतून म्हातारपणात विद्यार्थी, शिक्षकांचा आधार होऊ शकतो असा आशावाद स्पष्ट केला. दत्तानंद इंगोले यांनी ‘दीक्षाभूमी’ ही सामाजिक आशयाची कविता सादर केली. कवी संमेलनात डॉ. रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ यांनी कविता सादर करुन रसिकवृद्धांची दाद मिळविली. डॉ. अनवर अहमद सिद्दीकी यांनी जीवनविषयक भाष्य करणाऱ्या दोन गझल सादर केल्या. मातोश्री वृद्धाश्रमातील गिरीजाप्रसाद शुक्ला यांनी कवी संमेलनात सहभागी होवून ‘कैसी प्रगती’ कविता सादर केली. प्रभाकर पाटभल यांनी ‘अवहेलना दिन’ची कविता सादर करुन वृद्धाची समस्या मांडली. प्रा. अरविंद पाटील यांनी पावसावर ‘वैरी’ कविता सादर केली. यासह कवी संमेलनात डॉ. विद्या कळसाईत यांनी ‘उडान’, प्रशांत ढोले यांनी ‘पाऊस’, दिलीप गायकवाड यांनी ‘जूने दिवस’, संजय भगत यांनी ‘धुपट’, मोहन चिचपाने यांनी ‘जुने दिवस’, गणेश वाघ यांनी ‘दु:ख’, सुरेश मेश्राम यांनी ‘दुष्काळी मौसम पाण्याचा’ आणि डॉ. भास्कर नेवारे यांनी ‘गोंदन’ या कविता सादर केल्या. याप्रसंगी सुनील सावध यांच्या हस्ते मातोश्री वृद्धाश्रमात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. वनिता सावध, दिप्ती ससनकर, विठ्ठल गुल्हाणे, विनय डहाके, ईश्वर पवार, पाटील, कवी सुरेश सत्यकार, सुरेश बोरकर, प्रितेश मकेश्वर आदींची उपस्थिती होती. उपस्थित वयोवृद्धांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यानिमित्ताने सुनील सावध व रमेश खुरगे यांच्यातर्फे अल्पोहार व फळवाटप करण्यात आले. वृद्धाश्रमात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रमेश खुरगे यांनी केले. संचालन मीरा इंगोले यांनी तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले. कवी संमेलनामुळे सुरकुतलेल्या चेहऱ्यावर काही वेळाकरिता आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.