शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:05 IST

शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो.

ठळक मुद्देवाहनधारक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात : नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील रेल्वेस्थानक चौकापासून नाचणगाव रोड, कॅम्प रोड तसेच इतर लहान रस्त्यांवर मोकाट जनावरे मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यावरील जनावरांच्या ठिय्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार यांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागते. परिणामी, बरेचदा लहान-मोठे वाहनात अपघात होऊन रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो. या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस सावजाच्या शोधात इतरत्र फिरत असतात. वाहतूक पोलीस व यंत्रणा चिरीमिरी मिळविण्याच्या नादात डोळेझाक करते. त्यामुळे स्टेशन चौकात वाहतूक नियंत्रित होत नसल्याने अनेकदा अपघात होतात. नाचणगाव रोडवरील पं. दीनदयाल चौकात १० ते १२ जनावरांचा कळप ठाण मांडून असतो. हेच चित्र आर. के. हायस्कूलपासून पुढे पहायला मिळते. वास्ताविक मोकाट जनावरांना पकडून संबंधित पशुपालकांवर कारवाई करण्याचे काम पालिका व पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र, हा विभाग बघ्याची भूमिका घेऊन आहे. मोकाट जनावरांकडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक असून या प्रकाराकडे लक्ष देवून वाहनचारकांचा जीव वाचवून वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे. स्टेशन चौकात कर्तव्यावर असणाºया वाहतूक पोलिसांनी इतरत्र न भटकता चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकडेच लक्ष पुरविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या तर लहानमोठ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे बोलले जात आहे.वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्तआर्वी - सध्या शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर विचार करण्याची आवश्यकता आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्याची स्थिती, रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनाकरिता पार्किंगची योग्य व्यवस्था नसणे आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आर्वी शहरातील शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाण्यासाठी प्रथम विचार पडतो की, डावीकडून जावे की रस्त्याच्या उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच दुकानासमोर वाहने उभे राहत असल्यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेल्या दुकानामध्ये वाहने उभे केली जात असल्याने, शिवाय फळ-भाजीविक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाड्याकडे जाणाºया रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. रोडवर अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत मोठेमोठे खड्डे पडले आहे. हा अमरावतीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, यावर विश्वास बसणार नाही. अनेक अडथळे पार करीत वाहन अमरावतीकडे निघते. शिवाजी चौकाकडून बसस्थानकाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या रांगेतून रस्ता शोधत वाहन चालवावे लागते. आर्वी शहरातील प्रत्येक मुख्य चौकात रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या व लोकांची गर्दीच जास्त असते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा