शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:41 IST

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, ....

ठळक मुद्दे‘युवा परिवर्तन की आवाज’चे पालकमंत्र्यांना साकडे

ऑनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन रविवारी राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात आले.शासकीय जागांवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यांना आपल्या स्वप्नातील घर बांधणेही कठीण वाटते. ज्या जागेवर ते राहत आहेत ती जागा शासकीय असली तरी झोपड्यांमध्ये त्यांनी संसार थाटला आहे. सदर जागेचे त्यांना अद्यापही कायमस्वरूपी पट्टे न मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमण धारकांना जागेचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत देण्यात आली. परंतु, अद्यापही समस्या कायम आहे. सदर समस्येशी आपल्याला अवगत करून देण्यासाठी व समस्या निकाली निघावी यासाठी २२ फेब्रुवारीला युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर पोलिसांकडे रितसर आंदोलनासाठी परवानगी मागीतली;पण त्यांच्याकडून परवानगी नाकारण्यात आली.शिवाय त्याच दिवशी आपण योगगुरू रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने सदर समस्या आपल्या पर्यंत आम्हाला मांडता आली नाही. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना जागेचे नि:शुल्क पट्टे देण्यासाठी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.निवेदन देताना निहाल पांडे, पलाश उमाटे, कोमल झाडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ, सौरभ मोकाडे, यश सातपूते, अनिकेत मुन, तेजस भोयर यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्चेतही तोडगा नाहीस्थानिक जुना आरटीओ मैदान भागात आयोजित कार्यक्रमात निवेदन दिल्यानंतर युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विश्रामगृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सदर मागणीवर निवेदन देऊन चर्चा केली. परंतु, यावेळी समाधानकारक तोडगा न निघाल्याने युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात २० ते २३ मार्च दरम्यान वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार