शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे पूर्ण तरी काम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:35 IST

तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही.

ठळक मुद्दे२०१३ मध्ये झाले भूमिपूजन : वर्षभरापासून बांधकामाला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही. यामुळे येथील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२६ एप्रिल २०१३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सेलू तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची नवीन इमारत व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. या अगोदरच बांधकामाला सुरुवात झाली होती. याच दिवशी तत्कालीन पाणी पुरवठा आणि स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते तत्कालीन आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आता पाच वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत तहसील कार्यालयाची व रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानाची इमारत आजही अर्धवटच आहे. नव्हे तर एक वर्षापासून निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे भूमिपून समारंभाचे सोहळे तालुक्यात सुरू असतांना या दोन महत्त्वपूर्ण इमारतीच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष कसे हा तालुकावासीयांकरिता चर्चेचा विषय ठरत आहे.तहसील कार्यालय अद्यापही भाड्याच्या इमारतीतगत सहा वर्षांपुर्वी नव्या इमारतीकरिता तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली. त्या काळापासून येथील तहसील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे या इमारत बांधकामाला प्राधान्य देण्याची गरज आहे,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली.आरोग्यसेवेकडे दुर्लक्षकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत येथे नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. तालुकावासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही. या कारणामुळे निवास स्थानासाठी शासनाने निधी मंजूर केला; पण अर्धवट थांबलेले बांधकाम पाहुन विकासकामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.भूमिपूजन करणाऱ्यांनाच उद्घाटनाची संधीया दोन्ही महत्त्वपूर्ण इमारतीचे भूमिपूजन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व लोकप्रतिनिधीनी केले. त्याला पाच वर्षे पूर्ण झाली. अर्धवट राहिलेल्या बांधकामासाठी पुन्हा आघाडी शासन येईल व काम पूर्ण होईल, ज्यांनी भूमिपूजन केले तेच उद्घाटन तर करणार नाही ना, अशी खोचक प्रतिक्रिया तालुकावासी या बांधकामाबाबत देत असल्याचे दिसते.