शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नेत्ररोग निदान शिबिरातून पाच हजार रूग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:16 IST

येत्या फेब्रुवारी महिन्यापासून स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यांतील नेत्ररूग्णांच्या सेवेसाठी तब्बल १०० नेत्रतपासणी शिबिर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घेणार असल्याचा मानस केंद्रीय मंत्री जलसंधारण, नदीविकास व गंगा पुनर्जीवन भारत सरकार यांचे सल्लागार तसेच स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देस्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन : पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येत्या फेब्रुवारी महिन्यापासून स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा या तिन्ही तालुक्यांतील नेत्ररूग्णांच्या सेवेसाठी तब्बल १०० नेत्रतपासणी शिबिर आगामी सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घेणार असल्याचा मानस केंद्रीय मंत्री जलसंधारण, नदीविकास व गंगा पुनर्जीवन भारत सरकार यांचे सल्लागार तसेच स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.ही शिबिरे आर्वी विधानसभेतील सर्व २६ पंचायत समिती सर्कलमध्ये आवश्यकतेनुसार प्रतिसर्कल ३ ते ५ शिबिरे याप्रमाणे घेतली जातील, तर आर्वी, आष्टी व कारंजा शहराकरिता वेगळे मोठे शिबिर आयोजित करण्यात येईल. शिबिर घेताना त्या-त्या भागात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, पतसंस्था, महिला बचत गटांची, क्रीडा मंडळाची मदत घेतली जाईल. यापूर्वी आर्वी येथे, तर १३ जानेवारी रोजी गुरूदेव सेवा मंडळ व दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तळेगाव येथे १५५५ रूग्णांचे डोळे तपासल्या गेले. दोन्ही शिबिरे मिळून १३७२ रूग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तर या दोन्ही शिबिरांमध्ये ७२२ मोतिबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया करावे लागणारे रूग्ण आढळून आले. त्यांच्या शस्त्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीच आर्वी, आष्टी, तळेगाव व कारंजा येथे एक महिन्याचे मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्ग सुरू आहे.या प्रशिक्षणाकरिता ५००३ महिलांनी नावे नोंदविली असून आतापर्यंत ३०३० महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या या प्रशिक्षणाची तिसरी बॅच सुरू असून त्यामध्ये एकूण १६५० महिला प्रशिक्षण घेत आहेतस. यासंदर्भात बोलताना दिवे यांनी आर्वी विधानसभा क्षेत्रातील आवश्यकता असेल त्या सर्व महिलांना शिवणकला प्रशिक्षण दिल्या जाईल व याकरिता पुढील टप्प्यात जिल्हा परिषद सर्कल मुख्यालयात फिरते शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, असे सांगितले.पत्रकार परिषदेला मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव जयंत ढगे, सदस्य अमित कडवे, समन्वयक अशोक विजयकर, मंगेश चांदूरकर, सुनील इंगळे, विशाल गाडगे, सागर निर्मळ, जया चौबे, दिवाकर भेदरकर आदी उपस्थित होते.