शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री पाच घरफोड्या

By admin | Updated: August 12, 2016 01:36 IST

संपूर्ण शहर झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील गांधी नगर, हरिराम नगर, टिळक नगर भागात चोरट्यांनी पाच कुलूपबंध घराचे कुलूप तोडून

पुलगावात चोरांची दहशत : दोन दुचाकी व मोबाईलसह लाखांचा ऐवज लंपास पुलगाव : संपूर्ण शहर झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील गांधी नगर, हरिराम नगर, टिळक नगर भागात चोरट्यांनी पाच कुलूपबंध घराचे कुलूप तोडून रोख, सोने, चांदीचे दागिने दोन दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या सहाही ठिकाणी सारख्याच पद्धतीने चोरी केल्याचे दिसून आले. या चोरींची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीचा तपास करण्याकरिता वर्धा येथून शोध व ठसे तज्ज्ञांची चमू व श्वानपथक दाखल झाले. गांधी नगरातील विनोद खेडकर हे घराला कुलूप लावून परिसरातील त्यांच्या मोठ्या भावाकडे झोपायला गेले होते. ते सकाळी घरी आले असता घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घरातून ८ ते १० ग्रॅम सोन्याची साखळी व ३ हजार ५०० रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. याच भागातील निरूपमा यादव या हिंगणघाट येथे नोकरी करतात. त्यांच्या घरालाही कुलूप होते. त्यांच्या घराचेही कूलूप तोडल्याचे सकाळी दिसून आले; पण चोरट्यांनी त्यांच्या घरातून काय लंपास केले हे कळू शकले नाही. सचिन कोंबे यांनी घरासमोर ठेवलेली एमएच ३२ के ६७५६ क्रमांकाची दुचाकीही या चोरट्यांनी लंपास केली. हरिराम नगर परिसरातील अशोक चावके हे वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले व कपाटातील १४ हजाराचे चांदीचे भांडे तसेच १५ हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये व अंगणात ठेवलेली ६२ हजार रुपये किंमतीची एम.एच.३२/५०५२ क्रमांकाची दुचाकी लंपास केल्याचे चावके यांनी सांगितले. टिळक नगरात जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या एका घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. घरात राहणाऱ्या मुली बाहेरगावी गेल्यामुळे येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. या चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ व शोध पथक, श्वान पथक शहरात दाखल झाले आहे. एकाच रात्री घडलेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीती निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त सुरू करावी अशी नागरिकांची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)