शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुका राज्यात प्रथम

By admin | Updated: May 8, 2016 02:37 IST

ग्रामस्तरावरील प्रशासन लोकाभिमुख करून प्रशासनाला गती देण्यासोबत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ

पंचायत सशक्तीकरण अभियान : १०० पैकी ९७ गुण घेऊन अव्वलकारंजा (घा.) : ग्रामस्तरावरील प्रशासन लोकाभिमुख करून प्रशासनाला गती देण्यासोबत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) पंचायत समिती पंचायत राज सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम आली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री विरेंद्र सिंह यांच्या हस्ते कारंजा पंचायत समितीच्या सभापती संगीता खोडे, गट विकास अधिकारी बाळासाहेब यावले यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले.जमशेदपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत राज दिन कार्यक्रमात कारंजा पंचायत समितीचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत सन २०१३-१४ मध्ये केंद्र शासनाच्यावतीने सुरू केलेल्या केंद्रीय पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत शासनाच्या सर्व निकषांमध्ये कारंजा पंचायत समिती पात्र ठरली.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून पंचायत समितीने लोकाभिमुख कामे केली. विविध योजनेचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, मनरेगांतर्गत सिंचन विहिरी, फळबाग, जनधन, वृक्ष लागवड, जलयुक्त शिवार अभियान, इंदिरा आवास योजना, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामसभांची प्रभावी अंमलबजावणी, गावातल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, गावकृती आराखड्याचे सुक्ष्म नियोजन करून विकासकामाला गती देण्याचे कार्य कारंजा पंचायत समितीने केले आहे. या सर्व बाबींची पाहणी व निरीक्षण अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या तपासणी पथकाने केल्यानंतर राज्यातून कारंजा समितीने १०० पैकी ९७ गुण घेऊन अव्वल क्रमांक प्राप्त केला. तर दुसऱ्या क्रमांकावर कराड पंचायत समितीला ९५ गुण मिळवून बहुमान पटकावला.नागपूर विभागीय आयुक्त अनूप कुमार, विकास विभागाचे उपायुक्त अनिलकुमार नवाले, आस्थापना विभागाचे उपआयुक्त कमलकिशोर फुटाणे, सहायक आयुक्त दया राऊत, तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांनी याकरिता मार्गदर्शन केले. तसेच या यशाबद्दल पंचायत समितीच्या सभापती खोडे, गटविकास अधिकारी यावले यांचे अभिनंदन केले.अभियान यशस्वीतेसाठी सभापती खोडे, उपसभापती शुभांगी पठाडे, जिल्हा परिषद, पंचायात समिती, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकाऱ्यांनी, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. या सर्वांचे आभार सभापती, गटविकास अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मानले.(तालुका प्रतिनिधी)