शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पहिले शेळी मार्केट वर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:17 IST

विदर्भातील पहिली गोट (शेळी) बाजारपेठ वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे उभी राहणार आहे. जागेचा तिढा सुटला असून जिल्हा प्रशासनाने या बाजारपेठेसाठी जानेवारी महिन्यात दोन हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसालोड येथे दिली प्रशासनाने जागा ३ कोटींचा निधी उपलब्ध होणार

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील पहिली गोट (शेळी) बाजारपेठ वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे उभी राहणार आहे. जागेचा तिढा सुटला असून जिल्हा प्रशासनाने या बाजारपेठेसाठी जानेवारी महिन्यात दोन हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर शेळी बाजाराकरिता ३ कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. खासदार रामदास तडस यांनी राज्याचे वित्त नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. व त्यांनी निधी देण्याबाबत हिरवी झेंडी दिली असल्याने या बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला आहे.वर्धा जिल्ह्यात सालोड (हिरापूर) येथे शासकीय २ हेक्टर जागेवर विदर्भातील पहिले व महाराष्ट्रातील आगळेवेगळे गोट मार्केट यार्ड स्थापन करण्यात येणार आहे. सदर जागा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी ४ जानेवारी २०१९ अन्वये आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे यांचे नावे अभिहस्तांकीत करण्यात आलेली आहे. सदर शेळी बाजार दर शुक्रवारला सुरू राहणार असून त्यादिवशी शेळ्यांची खरेदी-विक्री होईल. त्यामुळे ग्रामपंचायत उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेळ्याकरीता बाजारपेठ उपलब्ध होईल व त्यांच्या उत्पादनास योग्य बाजारभाव मिळेल. गोट मार्केट यार्डमध्ये लेंडी खत प्रकल्प करीता शेळीपालकांकडून योग्य दराने शेळ्यांची लेंडी खरेदी करून त्यावर प्रक्रिया केल्या जाईल व उत्पादित लेंडी खत पॅकिंग करून मोठ्या शहरामध्ये विक्री केल्या जाईल. गोट मार्केट यार्डमध्ये उच्चमूल्यवर्धित व गुणवत्तापूर्ण शेळ्यांची पैदास कार्यक्रम राबविल्या जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना उच्च प्रतिचे बोकड खरेदी साथी उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित उत्पादन मुंबई, हैद्राबाद सारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये विक्री करता येईल. शेतकरी प्रशिक्षण केंद्र अद्यावत, वातानुकूलित राहणार असून त्यामध्ये एकाच वेळी १०० शेतकऱ्यांना/पशुपालकांना प्रशिक्षणाची सोय असणार आहे. तसेच सदरील प्रशिक्षण केंद्र इतरवेळी विविध विभागाचे प्रशिक्षणाकरिता नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकरी निवासमध्ये बाहेरगावरून आलेल्या शेळीपालकांना निवासाची विनामुल्य व्यवस्था राहील, अशी माहिती देवळी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय खोपडे यांनी दिली आहे. गोट मार्केट यार्डमध्ये अंदाजे १ एकर जागेमध्ये चारा बाग राहील. यामध्ये शेळ्याकरिता आवश्यक प्रगत बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करण्यात येईल. चारा बागेमध्ये उत्पन्न होणारा चारा बाजाराचे दिवशी शेळीपालकांच्या शेळ्याकरिता माफक दराने उपलब्ध केल्या जाईल तसेच शेतकऱ्यांना गरजेनुसार ठोंबे शासकीय दराने पुरवठा केल्या जाईल. पैदाशीसाठी ठेवलेल्या शेळ्यांना सुध्दा सदरील चारा बागेतून चारा पुरवठा केल्या जाईल. गोट मार्केट यार्डमध्ये बाजाराचे दिवशी पशुप्रथोमपचार केंद्र कार्यरत राहील. याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार नाही. सालोड (हि.) येथे जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी- २ कार्यरत असून सदरील दवाखान्यातील कर्मचारी बाजाराचे दिवशी पशुवैद्यकीय सेवा पुरवतील.

या सुविधा राहणार मार्केटमध्ये मार्केट यार्डमध्ये शेळ्यांचे दुधावर प्रक्रिया करून निर्मित उत्पादने उदा. पनीर, चिज, आईसक्रीम, साबण, शांपु इ. बाजारपेठेमध्ये उमेद मार्फत विक्री केल्या जाईल. याकरिता शेळी पालकांकडून अतिरिक्त शेळ्यांचे दुध खरेदी करण्यात येईल. गोट मार्केट यार्डमध्ये शेळ्यांकरिता दाणा मिश्रण, पशुचाट (मिनरल विट) तयार करून शेळीपालकांना किफायतशीर दरावर उपलब्ध करून देण्यात येईल.

टॅग्स :agricultureशेती