शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ जागेमुळे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:37 IST

शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय वाढीस लागावा या उद्देशाने जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ देवळी येथे करण्यात येणार होती; पण जागा उपलब्ध होत नसल्याने सदर बाजारपेठ निर्मितीचे काम आता रखडले असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देदेवळीसाठी खासदार आग्रही : जागा नसल्याने प्रशासनापुढे पेच

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय वाढीस लागावा या उद्देशाने जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ देवळी येथे करण्यात येणार होती; पण जागा उपलब्ध होत नसल्याने सदर बाजारपेठ निर्मितीचे काम आता रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर बाजारपेठ देवळी येथेच निर्माण करण्यासाठी खासदारांचा आग्रह असला तरी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनासमोर नवीनच पेच निर्माण झाला आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यावर उपाययोजना म्हणून शेतकºयांना शाश्वत उत्पादनाचे साधन निर्माण करून देण्यासाठी पशुपालन व्यवसायाकडे वळविण्यात येत आहे. त्यातूनच शेळीपालन व्यवसाय वाढीला लावण्यासाठी शेतकºयांना पशुसंवर्धन विभागाकडून शेळीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शेळीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विदर्भात पहिली बाजारपेठ देवळी येथे निर्माण करण्याची घोषणाही तीन महिन्यांपूर्वी खा. रामदास तडस यांच्या उपस्थितीत देवळी येथे करण्यात आली होती. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधीही उपलब्ध करून देण्यात येणार होता.अधिकृत घोषणेमुळे पशुसंवर्धन विभागाने बाजारपेठेसाठी देवळी येथे जागेचा शोध सुरू केला; पण देवळी येथे शासनाची कोणतीही जागा सध्या उपलब्ध नाही, अशी माहिती तहसीलदारांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना दिली. यामुळे देवळी येथे या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होण्याची आशा मावळली आहे. देवळी लगत असलेल्या सालोड (हिरापूर) येथे परिवहन विभागाला दिलेल्या जागेच्या शेजारी शासकीय जागा उपलब्ध आहे; पण या ठिकाणी सदर शेळी बाजारपेठ निर्माण करण्याबाबत राजकीय मतैक्य झालेले नाहीत. सालोड (हिरापूर) हे वर्धा विधानसभा क्षेत्रात येणारे गाव असल्याने येथे ही बाजारपेठ निर्माण करण्यास खासदारांचा विरोध असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परिणामी, विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ जागेच्या अभावी रखडली आहे.राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रात तीन शेळी बाजारपेठा सुरू केल्या आहेत; पण विदर्भातील या पहिल्याच बाजारपेठेला ग्रहण लागले आहे.एक कोटी देण्याची केली होती घोषणागोट फार्म (बाजार पेठ) उपलब्ध करुन देण्यासाठी जमीन व शेड उभारणीसाठी १ कोटीचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा खा. रामदास तडस यांनी १ डिसेंबर २०१७ रोजी देवळी येथे आयोजित शेळीपालनकार्यशाळेत केली होती. विदर्भ शेळी पालनात मागास आहे. यामुळे शेळी पालकांना संघटीत करुन शेळीचे मटण, लोकर, खुरे, खन आदीचे महत्त्व पटवून देण्यासह प्रत्यक्ष नगानुसार शेळीची विक्री व्हावी म्हणून बाजारपेठेची संकल्पना मांडली होती.