शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१९३० च्या जंगल सत्याग्रह भूमीवर ८७ वर्षांनी प्रथमच ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:08 IST

नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले.

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ध्वजवंदनाचा मान अंकिता होले यांना

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. चार-चारचे शेकडो गट गारगोटी गडाच्या माथ्यावर शिस्तबद्धरित्या जात होते. यावेळी धास्तावलेल्या इंग्रजांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्ह्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून राज्य गॅझेटीअर बुकमध्ये तळेगाव जंगल सत्याग्रहाची नोंद आहे. या गडावर १९३० नंतर ८७ तर स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा एकता संदेशाने प्रभावित होऊन आदरांजली वाहण्यासाठी भाजयुमोचे महामंत्री राहुल बुले यांनी तिरंगा एकता रॅलीचे आयोजन केले होते. याबाबत शासनाच्या सर्व विभागांना रितसर माहिती देऊनही पोलीस ठाणे व वनपरिक्षेत्र तळेगाव यांनी जंगल सत्याग्रह भूमीवर ध्वजारोहण व आदरांजली वाहण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. यामुळे २५ जानेवारी रोजी रात्री भाजप कार्यकर्ते व प्रशासनात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी भाजपाचे नेते मुकूंद ठाकरे व सहकाºयांनी विभाग प्रमुखांशी सामंजस्याने चर्चा करून जंगल सत्याग्रहाची सुरूवात झालेल्या गडाजवळील मैदानात ध्वजारोहण तर गारगोटीच्या माथ्यावर आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम, असा तोडगा निघाला. उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेत रॅलीला रितसर परवानगी दिली.गणराज्यदिनी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. यानंतर जि.प. सदस्य अंकिता होले यांच्या हस्ते गडाजवळील मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. तेथून रॅलीद्वारे गारगोटीच्या माथ्यावर जाऊन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी हेमलता भगत, आशा निंभोरकर, कमल कुलधरीया, कमलाकर निंभोरकर, सुरेश नागपुरे, वेद खा पठाण, शरद दिघडे, दत्तात्रय पुसदेकर, सुनील मोहेकर, प्रशांत कडू, नंदू जाधव उपस्थित होते.या तिरंगा एकता उपक्रमाने अनेक वर्षांनंतर पहिल्यादांच तळेगावसह पंचक्रोशीत देशभक्तीचे भारावणारे वातावरण निर्माण झाले होते. जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाला उजाळा देत ध्वजारोहण तथा आदरांजली कार्यक्रमाला शेकडो महिला, पुरूष, युवक, युवती गडावर व गारगोटीच्या माथ्यावर उपस्थित होते.कारावास प्रमाणपत्रही ठरले पुरावा१९३० च्या आंदोलनातील एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. बापूराव सदुजी भोयर रा. खडका यांना प्राप्त झालेले अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नागपूर यांचे कारावास प्रमाणपत्र त्यांचे दत्तकपुत्र मनोहर भुयार रा. तळेगाव यांच्याकडे समितीला प्राप्त झाले. त्या प्रमाणपत्रात ८ आॅगस्ट १९३० रोजी वन कायद्याच्या कलम २६ (९) अन्वये वर्ग २ न्यायालय आर्वी यांनी भोयर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यात १७ आॅगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करून ७ नोव्हेंबर १९३० रोजी सुटका केल्याचे नमूद आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून त्यांना शासनाकडून १९८० पर्यंत मानधन मिळत होते, हे विशेष!जंगल सत्याग्रह व इतिहासातील तळेगावचे महत्त्व याबाबत मागील अनेक वर्षांपासून सत्याग्रह स्मारक समिती संशोधन करीत आहे. त्यांनी अनेक पुरावे गोळा केले. या इतिहासाबद्दल कुणाकडे माहिती वा पुरावे असल्यास त्यांनी सचिन होले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.