शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पवनारात साकारणार जिल्ह्यातील पहिली ‘ई-लायब्ररी’

By admin | Updated: December 10, 2015 02:20 IST

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांच्या अवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यातच वाचनाची माध्यमेही ...

हर्षल तोटे पवनारविद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांच्या अवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यातच वाचनाची माध्यमेही बदलून त्यात अनेक ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शिरकाव केला आहे. हीच बाब हेरून पवनार येथील ग्रामपंचायतने नागरी सुविधा योजनेंतर्गत ई-लायब्ररी तयार करण्याचा ठराव पारित केला आहे. एवढेच नव्हे तर निर्मितीप्रक्रियेलाही सुरूवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळी ही लायब्ररी जिल्ह्यातील पहिली ई-लायब्ररी ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी आणि विनोबांचे गाव अशी पवनारची ओळख आणखी प्रगल्भ व्हावी, यासाठी हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ही लायब्ररी वाय फाटा युक्त राहणार असून विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. या लायब्ररीमध्ये स्पर्धा परीक्षेकरिता लागणारी पुस्तके, काम्प्युटर्स, इंटरनेट, शेती उपयोगी पुस्तके, मासिकं यासह विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी लागणारे संपूर्ण अभ्यासोपयोगी साहित्य येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती सरपंच अजय गांडोळे यांनी दिली. याकरिता लागणारा निधी नागरी सुविधा योजनेंतर्गत अभ्यास केंद्र या सदराखाली उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यामध्येही पवनार विभागातील अनेक योजना समाविष्ट करण्यात आला असून पर्यटनाच्या सुविधेवर भर देण्यात आला आहे. नंदी खेडा परिसरात सुद्धा १९.८६ लक्ष रू. सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले असून १३ लक्ष रूपयांच्या सभागृहाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. यामुळे नंदीखेडा परिसरात उत्तरक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांची अडचण दूर होणार आहे. त्याचप्रकारे २०१४-१५ चा वार्षिक अहवाल सुद्धा ग्रा. पं. ने आपल्या करदात्यांना देऊन नवीन पायंडा पाडला आहे. करदात्यांना आपल्या कराचा वापर कश्यासाठी होतो ही माहिती देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असल्याचे सरपंच अजय गांडोळे सांगतात. कर रूपातून व शासनाच्या विविध योजनेंतर्गत जमा झालेल्या निधीपैकी ३७ लक्ष ४१ हजार २८८ रू. नागरी सुविधेंतर्गत खर्च झाले आहे. एप्रिल अखेरची अंतिम शिल्लक १५ लक्ष ४७ हजार ७३० रू. दाखविण्यात आले आहे. अश्या प्रकारचा वार्षिक अहवाल करदात्यांना देणारी पवनार ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरणार आहे. असे असतानाही महिलांनी पुढाकार घेऊनसुद्धा दारूबंदीची चळवळ मात्र काही प्रमाणात क्षीण झालेली दिसते. त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी असतानाही दारूचे पाट मात्र वाहतच आहे. याकडेही लक्ष देत दारूबंदीसाठी एखादा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.