शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला आग; तीन जनावरांचा मृत्यू

By admin | Updated: May 24, 2017 00:48 IST

नजीकच्या आपटी शिवारातील निशाद ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतातील गोठ्याला सोमवारी दुपारी शॉटसर्किटमुळे आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क नाचणगाव : नजीकच्या आपटी शिवारातील निशाद ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतातील गोठ्याला सोमवारी दुपारी शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन गायींसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय गोठ्यातील काही साहित्याचाही कोळसा झाला. घटनेचे गांभीर्य कळाल्याने नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली; परंतु ते आगीसमोर हतबल ठरले. सिंचनाचे पाईप, ढेपीची पोती, कुटार, फवारणी पंप, आॅईल इंजीनसह शेतीउपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी आल्या. यात शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुधन अधिकारी डॉ. दिलीप कडू यांनी मृत जनावरांचे शविच्छेदन केले. या शेतकऱ्याला मदत मिळण्याची मागणी होत आहे. महावितरणकडून पाहणी शॉटसर्किटने आग लागल्याची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकऱ्यांनी घटनेची पाहणी केली व त्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळविले आहे. महसूल विभागाने दखल घेत तलाठी चौधरी यांनी पंचनामा केला व अहवाल देवळी तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना सादर केला. सध्या शेतकरी पेरणी पूर्व मशागतीच्या कामाकडे लक्ष देत आहेत. त्यातच अशी घटना म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावे लागेल. खरीपाच्या तोंडावर झालेल्या नुकसाने शेतकरी हतबल झाला आहे.