शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

भाजी बाजारात दुकानाला आग

By admin | Updated: April 10, 2017 01:27 IST

येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रविवारी दुपारी गवताला आग लागली. ही आग क्षणात लगतच्या भाजी बाजारात पोहोचली.

पुलगाव : येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रविवारी दुपारी गवताला आग लागली. ही आग क्षणात लगतच्या भाजी बाजारात पोहोचली. यात बाजारातील एका दुकानाचा मागील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आला. यात दुकानातील लाकडी आलमाऱ्यासह प्लास्टिकचे २०० कॅरेट जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येथील कॅम्परोडवरील भाजी बाजारात शेख जुबेर अब्दुल कलाम यांचे दुकान आहे. त्यांनी पिकल्या आंब्याचा साठा करण्याकरिता या दुकानात प्लास्टिकचे जवळपास ५०० कॅरेट ठेवले होते; परंतु या लागलेल्या आगीत २०० कॅरेट व त्यातील लसन, अद्रक व आलू आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी आले. परिसरातील काहींनी पाण्याचा मारा करून आग विझविली. याच परिसरात लाकडाचे खोड जळत असल्याची माहिती काही युवकांनी रेल्वे पोलिसांना दिली; परंतु त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. केंद्रीय दारूगोळा भांडाराचे अग्निशामक दलाने दुकानावर पाण्याचा मारा केला आणि जळते खोड विझविले. आग विझविण्याकरिता परिसरातील देवेंद्र सोनटक्के, जाकीर हुसेन, के.टी. बोहरा, विजय, कपील शुक्ला, झाडे, बैस, लतीफभाई, सोनू फारूक हुसेन, तौफीक, मोनू या युवकांनी प्रयत्न केले.(तालुका प्रतिनिधी)