शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

ग्रामीण भागात पेट्रोल पंपांचे फायर आॅडिट रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:58 IST

सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे.

ठळक मुद्देसुरक्षा धोक्यात : तपासणीची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांवर

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे. बहुतांश पेट्रोल पंपांवरील अग्निशामन यंत्रे कालबाह्य तथा निकामी असून आग लागल्यास ती नियंत्रणात आणणे अशक्य होईल, असे चित्र दिसत आहे.पेट्रोलपंपांवर ग्राहकांना आवश्यक सुविधा पडताळणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांची आहे. ग्रामीण भागात काही मोजक्याच पेट्रोलपंपांवर या सुविधा आहेत. पंप हे नियमानुसार सुरू आहेत अथवा नाही, ही खबरदारी घेण्यासाठी पेट्रोलीयम कंपन्यानीही आकस्मिक भेट देऊन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही अग्निशामक यंत्राची दुरूस्ती व बदलण्याची जबाबदारी पेट्रोलपंप मालकांनी घेतली नाही.आग लागल्यास ती रोखण्यासाठी वा विझविण्यासाठी पेट्रोल पंपांवर असलेले ‘एक्स्टिंग्युशर’ हे कालबाह्य आहेत. या अग्निशामक यंत्रातील गॅस अथवा ड्राय केमिकल मुदतीत बदलविण्यात आलेले नाही. काही पंपांवर आहे की नाही, हे सुद्धा माहिती नाही. पेट्रोल पंपांवर स्वतंत्र ५ ते १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे; पण तेही दिसून येत नाही. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आग विझविण्यासठी लोखंडी बादल्यामध्ये वाळू (रेती) भरून ठेवली जाते; पण काही पेट्रोलपंपांवर त्या बकेटही नाही तर काही पेट्रोल पंपांवर बकेटमधील रेतीची माती झालेली आहे.पेट्रोलपंप मालक हे केवळ व्यावसायिक हित जपत असून त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असून पेट्रोलपंपांवर अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदारी स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण वर्धा तालुक्यातील पंपांवर सुरक्षा रामभरोसे दिसत आहे.पेट्रोल चोरीलाही उधाणकाही पेट्रोल पंपांवर पेट्रोल चोरीची घटना उघडकीस येत असतात. काही पेट्रोल पंपांवर पाईपद्वारे पेट्रोलऐवजी हवाही आकली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यात पेट्रोल पंपांवरील पेट्रोल भरणारा पाईप काळ्या रंगाचा असतो. त्या ऐवजी पाईप हा पांढरा म्हणजे पारदर्शक पाईप लावल्यास पेट्रोल टाकीत जाताना दिसेल. यावरून पेट्रोल भरताना नागरिकांनाही आपल्या गाडीमध्ये किती पेट्रोल पडते, याचा अंदाज येऊ शकेल. याद्वारे पेट्रोल चोरीला आळा बसू शकेल.

टॅग्स :Petrolपेट्रोल