शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात

By admin | Updated: June 1, 2016 02:36 IST

पुलगाव येथील मध्यवर्ती दारूगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्पमध्ये) सोमवारी मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आली आहे.

पाच गावातील नागरिकांना हलविले : प्रशासनाकडून उपाययोजना सुरू वर्धा : पुलगाव येथील मध्यवर्ती दारूगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्पमध्ये) सोमवारी मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आली आहे. आगीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आजूबाजूच्या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीची माहिती कळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल सकाळी पाच वाजतापासून घटनास्थळावर उपस्थित होते.घटनेची माहिती देवळी तहसीलदारांकडून प्राप्त होताच आग आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यासह नागपूर व यवतमाळचे अग्निशामक वाहने तातडीने उपलब्ध करून देण्यात आली. कॅम्पमधील सेना अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रशासनाच्यावतीने पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका व अग्निशामक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम यांच्याशी संपर्क साधून पुरेशाप्रमाणात रुग्णवाहिका व प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीमुळे आजुबाजूच्या पाच गावातील नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुरदगाव, आगरगाव, यसगाव, नागझरी व पिंपरी या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेदृष्टीने देवळी येथील नगर परिषद शाळा व डिगडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. नागरी वस्तीमध्ये सदर स्फोट व आगीमुळे कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही. सदर विस्थापिकांच्या कॅम्पलाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)