शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

इटलीची ‘फनफिला’ भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:09 IST

सध्या भारतीयांंकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या महिलेने वर्धेतील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, .......

ठळक मुद्देअष्टमीच्या हवन पूजेला बसून आदीशक्ती चरणी अर्पण केली श्रद्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या भारतीयांंकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या महिलेने वर्धेतील श्री दुर्गा पूजा उत्सव समिती, वनमाली मेडीकल चौक, मेन रोड येथे अष्टमीच्या हवन पूजेला बसून भारतीय संस्कृतीचे धडे घेतले. इतकेच नव्हे तर त्यांचे पती सारंग काशीनाथ रडके यांच्यासह आदीशक्ती चरणी माथा टेकला.मूळचे अकोला जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असलेल्या सारंग काशीराम रडके यांनी आपल्या मुळ गावी सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचे धडे घेतले. त्यानंतर त्यांना कामानिमित्त विदेशवारीचा योग आला. याच दरम्यान दुबई येथे थाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिआॅन यांच्याशी ओळख झाली. आठ वर्षांपूर्वीच्या ओळखीने प्रेमाकडे वाटचाल करीत पुढे हे दोघेही पे्रम विवाहाच्या बंधनात अडकले. सन २०१७ मध्ये प्रेमविवाह झाल्यानंतर गणपती उत्सवादरम्यान सारंग व फनफिला हे दोघेही सारंगचे मामा सुरेश बडे यांच्याकडे वर्धेत आले. त्यापूर्वी सारंगने वर्धा शहराशेजारी नालवाडी भागात सदनिका घेतली होती. त्याच सदनिकेत सध्या हे नवविवाहित दाम्पत्य वास्तव्याला आहे. बुधवारी या नवविवाहित दाम्पत्याने नवरात्री उत्सवादरम्यान अष्टमीच्या हवन पूजेला यजमान म्हणून हजेरी लावत आदीशक्तीची उपासणा केली.इंडियात ‘नमस्कार’ तर थाईमध्ये ‘स्वधीखा’ असे संबोधले जाते. भारतात मी पहिल्यांदाच आली असून येथे आल्यावर मला आनंद झाला. येथील नागरिक चांगले आहेत. राम, सीता व हनुमान याबाबत मी आपल्या देशातही माहिती घेतली होती. भारतात येऊन मला खऱ्या अर्थाने राम, सीता व हनुमानाची आराधना करणाऱ्यांना जाणता आले. भारतातील साडी वेगळीच असून साडीमध्येही विविध प्रकार आहेत.- फनफिला चँग लिआॅन, नव विवाहिता.जेवण करायला गेला अन् पे्रमात पडलाथाई शेफ असलेल्या फनफिला चँग लिआॅन हिच्याशी सारंग रडके याची ओळख दुबई येथे आयोजित फुड फेस्ट मध्ये झाली. तेथे जेवन करताना सारंग हा फनफिलाच्या प्रेमात पडल्याचे तो सांगतो.इंग्रजीसह थाई भाषेचेच ज्ञानफनफिला हिला केवळ थाई व इंग्रजी येते. एखाद्याने फनफिलाशी संवाद साधल्यावर सारंग हा त्या व्यक्तीचे म्हणणे ट्रान्सलेट करून फनफिलाला समजावून सांगतो. सारंग याने फनफिला हिच्या प्रेमात पडल्यानंतर थाई भाषा शिकली, हे विशेष.अष्टमीच्या हवन पूजेत राज्यात पहिल्यांदा विदेशी महिला बसली असावी, असा आपला दावा नाही; पण वर्धेतील ही पहिलीच घटना असावी.- कमल कुलधरिया, माजी न.प. उपाध्यक्ष, वर्धा.पत्नी फनफिला हिला भारतीय संस्कृतीबाबत आदर आहे. तिला ती जाणून घेण्याची उत्सूकताही आहे. मी हवन बघीतला आहे. परंतु, लग्नानंतर हवनमध्ये बसण्याची फनफिला व माझी पहिलीच वेळ आहे. त्याबाबत तीही आनंदी आहे.- सारंग रडके, नवविवाहित, सॉफ्टवेअर अभियंता.